शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या जागेवर पोलिसांचे अतिक्रमण, मजुरांची परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:09 IST

मूळ जमीनमालकाने हमालांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर अलीकडच्या काळात पोलिसांनी आतिक्रमण केले आहे. बुधवार चौकातील (फरासखाना) मजूर अड्डा मजुरांसाठी हक्काचे ठिकाण आहे.

पुणे  - मूळ जमीनमालकाने हमालांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर अलीकडच्या काळात पोलिसांनी आतिक्रमण केले आहे. बुधवार चौकातील (फरासखाना) मजूर अड्डा मजुरांसाठी हक्काचे ठिकाण आहे. परंतु पोलिसांकडून या जागेवर अतिक्रमण करून मजुरांनाच या जागेवर थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे.हा इंग्रजांच्या काळापासून असलेला मजुरांच्या हक्काचा मजूर अड्डा आहे. मोक्याच्या व महत्त्वाच्या चौकात हा अड्डा आहे. सुरुवातीच्या काळात सुमारे दीड हजार ते दोन हजार मजूर रोजगार मिळावा म्हणून या अड्ड्यावर थांबत.मात्र, कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला. तसे मजुरांना येथे थांबण्यास मज्जाव करण्यात आला. काही वर्षांपूर्वी फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या रस्त्यालगत बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा भाग संवेदनशील म्हणून गणला जाऊ लागला. यामुळे इंग्रजांच्या काळापासून असलेला मजुरांच्या हक्काच्या अड्ड्यावर त्यांनाचथांबणे आता मुश्किल झाल्याचे चित्र आहे.पोलिसांकडून मजुरांना अरेरावीची भाषा१ स्व. काशीबाई घोले यांच्या नावे असलेली जमीन मजूर अड्ड्यासाठी दिलेली आहे. मात्र, या जागेवर फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी वाहने लावत असल्याने त्याला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. तसेच त्या जागेवर कोणी येऊ नये म्हणून बॅरिकेट्स लावले आहेत. काही बोलले असता पोलिसांकडून मजुरांना अरेरावीची भाषा ऐकावी लागते.२ मोकळ्या जागेवर बुधवार चौक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने अतिक्रमण करण्यात आले आहे. ‘मजूर अड्डा’ नावाचा फलक काढून तिथे गणपती मंडळाच्या नावाचा फलक लावून जागा जबरदस्तीने बळकावली आहे. त्यामुळे मजुरांना काम मिळवण्यासाठी रस्त्यावरच थांबावे लागते. मजुरांची हक्काची जागा असतानाही अन्याय सहन करावा लागतो आहे, असे नीलकंठ ऊर्फ कैलास गुंजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बुधवार चौकातील मजूर अड्ड्यावर पोलीस वाहने लावतात, हे पूर्णत: चूक आहे. अनेकदा सांगूनही त्याची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही. उपेक्षित जगणेच मजुरांच्या नशिबी आले आहे. किमान याची तरी दखल घेतली जावी. महापालिकेने या जागेवर कष्टकरी कामगारांची स्मृती जतन करावी.- बाबा आढाव, असंघटित कष्टकºयांचे नेते

टॅग्स :Puneपुणे