शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

निमसाखर येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:05 IST

निमसाखर हे पाच मोठ्या वाड्यावस्त्यांचे मिळून साडेपाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावामध्ये सरकारी जागेवर यापूर्वी जुनी अतिक्रमणे आहेत व सध्याही मिळेल

निमसाखर : निमसाखर व परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गायरान व गावठाणासह अन्य शासकीय जागेवर चार ते पाच हेक्टरपर्यंत अतिक्रमणे आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजूंची अतिक्रमणे नियमित करून सधन व प्रभावशाली मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

निमसाखर हे पाच मोठ्या वाड्यावस्त्यांचे मिळून साडेपाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावामध्ये सरकारी जागेवर यापूर्वी जुनी अतिक्रमणे आहेत व सध्याही मिळेल तिथे अतिक्रमणे बिनधास्तपणे करीत आहेत. स्थानिकांनी अनेक ठिकाणी जागा बळकावल्या आहेत. काही राजकारण्यांनी शासकीय जमिनी बळकावल्या असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. यात बऱ्याच संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक, गरीब कुटुंबीयांचीसुद्धा घरे शासकीय जागेत असल्याची माहिती पुढे येत आहे. गावठाण भागातही अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.या पूर्वी अतिक्रमणे काढली गेली नसली तरी मात्र गरजू वषांनुवर्षे राहत असलेल्या कुटुंबांची घरे नियमित करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.यामुळे ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी किंवा अतिक्रमणे नियमित करावे, यामुळे कररूपाने ग्रामपंचायत महसुलातही मोठी वाढ होईल आणि याचा फायदा ग्रामपंचायतीलाच होईल अशीही चर्चा होत आहे.मध्यंतरी शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकºयांच्या जमिनी वाटप झाल्यानंतरही निमसाखर हद्दीत अनेक ठिकाणी मंडळाच्या उरलेल्या शेतजमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमणे पाहावयास मिळत असल्याचे नागरिकांमधून चर्चा आहे. मात्र सध्या मोजणी विभागाकडून मोजणीचे काम रखडले आहे. संबंधित विभागाकडून हे काम लवकर मार्गी लावले जाऊन अतिक्रमणे किती आहेत, हे स्पष्ट होऊन नंतर कारवाई होईल. याचबरोबर निमसाखर भागात सार्वजनिक वनीकरण विभागाचे ३१.३० क्षेत्र असून पूर्वी मोठ्या प्रमाणावर या भागात वृक्षलागवड केली गेली होती. मात्र, नंतरच्या काळात दुर्लक्ष झाले आणि सध्या झाडे कमी पण काटेरी झुडपेच जास्त अशी अवस्था आहे. या ठिकाणी स्थानिक राजकारणाशी संलग्न असलेले गुंड प्रवृत्तीचे वाळूमाफिया यांनी अतिक्रमण करुन या ठिकाणी रस्ते आणि वाळूसाठे केले आहेत. काही सधन शेतकºयांनीसुध्दा वनीकरणाची जागा शेतीसाठी गिळंकृत केल्याची परिसरात चर्चा आहे.निमसाखर गाव परिसरात शेती महामंडळाची ५५.९३ हेक्टर, सामाजिक वनीकरण विभागाची ३१.३० हेक्टर, गायरानासाठी ३१.६८ हेक्टर तर गावठाण क्षेत्र ४.०५ हेक्टर अशी चारही विभागाची सरकारी १२२ हेक्टर क्षेत्र आहे. गायरान भागासह गावठाण भागातही अतिक्रमणे आहेत.

टॅग्स :Puneपुणे