शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

Mutha Canel:मुठा कालव्याच्या शंभर हेक्टरवर अतिक्रमण : जलसंपदा विभागाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 14:30 IST

मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती.

ठळक मुद्दे झोपडपट्टी, व्यायामशाळा, कार्यालयांची कालवाकालवया ठिकाणी दीड हजार झोपड्या असून त्यापैकी ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधितखडकवासला धरणापासून महानगरपालिका हद्दी पर्यंत तब्बल ३४ किलोमीटरचा कालवा अतिक्रमणांविरोधात काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात जनहीत याचिका देखील केली दाखल शहरातून गेलेल्या कालव्यालगत झालेल्या अतिक्रमणांची जलसंपदा विभागाकडून पाहणी

विशाल शिर्के पुणे: मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत मुठा डावा-उजवा कालव्यावर सुमारे शंभर हेक्टर (तीनशे एकर) जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती संपर्क कार्यालयापासून ते झोपडी, मंदिरे, व्यायामशाळा अशा विविध प्रकारच्या अतिक्रमणांचा समावेश आहे. ही अतिक्रमणे आठ दिवसांत हटवावीत अन्यथा ती जमिनदोस्त करण्यात येतील अशी नोटीस जलसंपदा विभागाने संबंधितांना बजावली आहे.   मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती. यात सर्व्हे नंबर १३२, १३३, १३० आणि २१४ या भागातील आंबिल ओढ्याच्या तीरावर वसलेल्या झोपड्यांची मोठी हानी झाली आहे. या ठिकाणी दीड हजार झोपड्या असून त्यापैकी ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाल्या आहेत. तर ८० ते ९० झोपड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत. तसेच दांडेकर पूल भागातील कासम प्लॉट परिसरातील ६० ते ७० झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले.खडकवासला धरणापासून महानगरपालिका हद्दी पर्यंत तब्बल ३४ किलोमीटरचा कालवा जातो. या शहरीभागात कालव्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. पर्वती येथील दुर्घटना बेकायदेशीररित्या टाकण्यात अलेल्या भूमिगत केबल लाईनमुळे झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. तर, अशा अतिक्रमणांविरोधात काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात जनहीत याचिका देखील दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातून गेलेल्या कालव्यालगत झालेल्या अतिक्रमणांची पाहणी जलसंपदा विभागाकडून नुकतीच करण्यात आली. कालव्याच्या मध्यमासून अंदाजे शंभर फूट अंतरावर दोन्हीबाजुला बांधकाम अथवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येत नाही. शहर हद्दीतून जाणाºया कालव्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत कालव्यालगतच्या जमिनीवर सुमारे शंभर हेक्टरवर अतिक्रमण झाले आहे. खडकवासला ते शहर हद्दीलगतच्या कालवा भागात पर्वती आणि हडपसर येथे सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी राजकीय व्यक्तींनी तर संपर्क कार्यालये थाटली आहेत. या शिवाय झोपड्या, मंदिर, व्यायामशाळा अशा प्रकारची देखील अतिक्रमणे आहेत.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाkalwaकळवा