शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत ‘घुसखोरी’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 14:16 IST

आयुक्तांकडून गंभीर दखल : अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश..

ठळक मुद्देपालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाअनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारल्याचा आरोप

पुणे : भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत बेकायदेशीर संरक्षक भिंत (कंपाऊंड वॉल) घालून पालिकेची जागा एका सोसायटीने बळकावल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असून, पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तसेच क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार निदर्शनास आणून देताच पालिका आयुक्तांनी एका महिला अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नुकतीच एका शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. भवानी पेठ (प्रभाग क्र. १९) मध्ये पालिकेचे हे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये नागरिकांसाठी व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, खेळ आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. पालिकेने याठिकाणी ओपन जीमही उभारली आहे. या ओपन जीमसह आसपासच्या जवळपास साडेतीन हजार चौरस फूट जागेवर तीन बाजूंनी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत अनधिकृत असून अवघ्या काही दिवसांतच ही भिंत उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतरही स्थानिक अधिकारी आणि क्रीडा विभागाच्या अधिकाºयांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे. या अनधिकृत भिंतीमुळे पालिकेच्या मालकीची जागा थेट शेजारच्या खासगी सोसायटीशी जोडली जाणार असून, या सोसायटीमध्ये स्थानिक राजकीय नेत्याचे घर आहे. राजकीय आशीर्वादाने हे अनधिकृत बांधकाम उभे करुन जागा बळकाविण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी याबाबत भवानी पेठ क्षेत्रीय अधिकाºयांकडे तक्रार केली होती. परंतु, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी थेट पालिका आयुक्तांची भेट घेत या विषयाकडे लक्ष वेधले. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आयुक्तांनी तत्काळ अनधिकृत भिंतीवर कारवाईचे आदेश दिले. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाही उपायुक्तांना केल्या आहेत...............अनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारल्याचा आरोपस्टेडियमच्या जागेत उभारण्यात आलेली अनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या भिंतीचा खर्च मात्र शाळेमध्ये केलेल्या कामातच दर्शविण्यात आल्याचा प्रकारही नागरिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेEnchroachmentअतिक्रमणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका