शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड, तीस टक्के घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:32 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पायंडा पाडल्याने

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पायंडा पाडल्याने कर्मचारी व अपंग नागरिकांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसत होते.कोरेगाव भीमा ग्रामपंचायत दरवर्षी ग्रामपंचायत कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असते. गतवर्षी ग्रामपंचायत करसंकलनावर स्थगिती असल्याने कर्मचा-यांना डबल बोनस देण्यास ग्रामपंचायतीला अडसर निर्माण झाला होता. मात्र, या वर्षी ग्रामपंचायतीने सर्व कर्मचाºयांना ३० टक्के घसघशीत पगारवाढ केली होती. नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर ग्रामपंचायतीने कर्मचाºयांना बोनस व मिठाई भेट देण्याच्या कार्यक्रमाला प्रभारी सरपंच कल्पना गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, योगेश गव्हाणे पाटील, सुरेंद्र भांडवलकर, सदस्या वृषाली गव्हाणे, पूजा भोकरे, मालन साळुंखे, संगीता कांबळे, शारदा गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस व सर्व कर्मचारी, अपंग नागरिक उपस्थित होते.या वेळी ४ क्लार्क, २ शिपाई, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सफाई या सर्व ३३ कर्मचाºयांना दोन पगार बोनस, कपडे, मिठाई भेट देऊन कर्मचाºयांची दिवाळी गोड केली. अपंग विकास निधीतून ३५ नागरिकांना प्रत्येकी ५ हजार अ‍ॅडव्हान्स निधी दिवाळीनिमित्त भेट दिली.या वेळी माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांनी सांगितले, की कामगारांना ग्रामपंचायत पगारवाढ, बोनस, इतर सुविधा पुरवीत असते. मात्र, त्याच वेळी कामगारांनीही आपली जबाबदारी ओळखून नागरिकांची सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. सरपंच कल्पना गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी कर्मचाºयांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच कर्मचाºयांनी गावाच्या विकासासाठी शंभर टक्के योगदान दिल्यास गावाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. या वेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक फडतरे, दत्तात्रय फडतरे व सुरेश भांडवलकर यांनी कर्मचाºयांना डबल बोनस देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत कर्मचाºयांनाही बोलावून समस्या जाणून घेण्याची पद्धत सुरू करण्याची मागणी केली.चांगल्या कर्मचा-यांना ट्रीपल बोनस देणारग्रामपंचायत कर्मचा-यांनी त्यांच्या कामाच्या शंभर टक्के योगदान दिल्यास नागरिकांच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होणार असल्याने पुढील वर्षापासून उत्कृष्ट काम करणाºया कामगारांना ट्रीपल बोनस देणार असल्याचे माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे