शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:23 IST

कोविड 19 ची वाढती रुग्णसंख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक

ठळक मुद्देकेंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक शुक्रवारी (दि.8) रोजी पुण्यात दाखल झाले. या पथकाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत जिल्ह्यातील कोरोना विषय सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. यामध्ये त्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे तसेच आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ. सुधीर गुप्ता यांनी केल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उप महासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते. डॉ. गुप्ता म्हणाले, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्हयाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणा?्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयात वाढत असणा?्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर.एस. आडकेकर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार