शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जिल्हा परिषद शाळेत 'डिजिटल डिव्हाईड' संपवण्यासाठी संगणक-लॅपटॉप दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:08 IST

शाळेतील विद्यार्थ्यांना ४ डेस्कटॉप, ६ लॅपटॉप दान

पुणे: विद्यार्थी आणि डिजिटल शिक्षण यांच्यातील अंतर संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेतील आयटी सोल्यूशन प्रदाता कंपनी इमर्ज 360 ने पुण्याच्या जिल्हा परिषद शाळा, डोणजे( हवेली) येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना 4 डेस्कटॉप व 6 लॅपटॉप दान केले आहेत.

आता शाळेत इंटरनेट व डिजिटल जगताशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधता येणार आहे. याचा उपयोग शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत होईल. जेथे मुले संगणक आणि डिजिटल जगाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. ही कंपनी यावर्षी दरमहा एका शाळेत 10 डेस्कटॉप/लॅपटॉप देईल. यासाठी फक्त अशा शाळा निवडल्या जातील. जे त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठी संगणक/लॅपटॉप व्यवस्था करू शकत नाहीत.

इमर्ज 360 चे श्रीराम धोत्रे म्हणाले की, प्रत्येक वर्गातील मुलांसाठी संगणक आणि लॅपटॉपची व्यवस्था करण्यात शाळा यशस्वी झाली नसल्याने ही शाळा निवडली गेली. पुणे हे आयटी आणि शैक्षणिक शहर आहे. अशा परिस्थितीत आम्ही समाजाचे ऋण फेडण्यासाठी आमच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून या शाळेपासून स्वतःची संगणक लॅपटॉप देणगी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासह येथे उच्च तंत्रज्ञानाचे डेस्कटॉप व लॅपटॉप उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही घेण्यात आला.पुण्याखेरीज ही कंपनी मुंबई व दिल्ली येथेही आहे. भारतात जवळपास 100 कर्मचारी आहेत. कोरोना कालावधीत कंपनीने कोणताही कर्मचारी काढला नाही किंवा कोणाचा पगारही कमी केला नाही. जिल्हा परिषद शाळा डोणजेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी निफाडकर म्हणाल्या की, इमर्ज 360 च्या या प्रतिसादाचे स्वागत आहे. या संगणकीय देणगीमुळे मुलांना संगणक प्रयोगशाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळतील. ते इंटरनेट आणि संगणकाच्या जगाशी अधिक चांगले कनेक्ट होऊ शकतील.