शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा मनोरुग्णालयाच्या असंवेदनशील कारभाराबाबत आमदार मुळीक यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:00 IST

मनोरुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेसह रुग्णांच्या काळजी,उपचार व देखभालीसह अनेक गंभीर समस्यांबाबत आमदार मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : स्वच्छतेसह रुग्णांचे उपचार व काळजीसाठी दिल्या सूचनागंभीर समस्यांसंदर्भात आरोग्य मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार

विमाननगर : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथील असंवेदनशील विविध समस्याबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकतीच पाहणी केली .मनोरुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेसह रुग्णांच्या काळजी,उपचार व देखभालीसह अनेक गंभीर समस्यांबाबत आमदार मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी रुग्णालय अधीक्षक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.    यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा विभाग संजय देशमुख , आरोग्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक बलोनिकर, रुग्णालयाचे अधीक्षक अभिजित फडणीस यांच्यासह पाहणी व चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार जगदीश मुळीक यांनी उपचार करून बरे झालेल्या रुग्णांसाठी "खुले कक्ष" सुरु करण्यासाठी संबंधित विभागाकडून पाठपुरावा करून सुरु करावे तसेच रुग्णालयाची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्यात येत नाही. अनेक कक्षांमध्ये मध्ये दुर्गंधी होत असल्याने रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विविध आजाराने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णांना हव्या असणाऱ्या सुविधा पुरविल्या जात नाही. रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करत नसल्याने मलेरिया , डेंगू यांसारख्या श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गंभीर समस्यांबाबत व रुग्णाच्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन दिरंगाई करत असल्याचे आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले. याप्रसंगी मनोरुग्नालयात कामाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचारी व  अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आमदार मुळीक यांनी यावेळी स्पष्ट केले . तसेच संपूर्ण रुग्णालयाची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी. रुग्णांना सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अशा सूचना केल्या . या सर्व गंभीर समस्यांसंदर्भात आरोग्य मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर, सागर म्हस्के, राहुल पंडागळे उपस्थित होते.

टॅग्स :Yerwadaयेरवडाjagdish mulikजगदीश मुळीकHealthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालय