शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

लोकमत न्युज नेटवर्क पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची नियमित दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून २३ हजार १२० विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्युज नेटवर्क

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची नियमित दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून २३ हजार १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये दि. ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसºया फेरीत सर्वाधिक १० हजार प्रवेश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली फेरी काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली होती. पण मराठा आरक्षणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

दुसऱ्या फेरीत एकुण ६० हजार ५९९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४६ हजार ७१४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यातून गुणवत्तेनुसार २३ हजार १२० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये १० हजार ८९ विद्यार्थी विज्ञान शाखेतील तर ९ हजार ७६२ विद्यार्थी वाणिज्य शाखेतील आहेत. एकुण अर्जांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या पसंती दिलेल्या ८ हजार ९२९ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. ९ डिसेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द व नाकारताही येऊ शकतो. तसेच पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरता येईल. प्रवेशाची नियमित तिसºया फेरीसाठी रिक्त जागांची माहिती दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर केली जाणार आहे.

----------

दुसऱ्या फेरीची प्रवेश स्थिती

शाखा उपलब्ध जागा अर्ज निवड झालेले विद्यार्थी

कला १०,०७५ ४,३५१ २,६७२

वाणिज्य २४,०५२ २०,३४८ ९, ७६२

विज्ञान २३,१७० २१,१९२ १०,०८९

व्होकेशनल ३,३०२ ९०३ ५९७

------------------------------------------------

एकुण ६०,५९९ ४६,७९४ २३,१२०

-------------------------------------------------

पसंतीक्रमानुसार झालेली निवड

पसंती क्रम विद्यार्थी

१ ८,९२९

२ ४,१४७

३ २,८५३

४ २,०६४

५ १,६१२

----------------------

आतापर्यंत निश्चित झालेले प्रवेश

कोटा प्रवेश क्षमता झालेले प्रवेश

इनहाउस ७४८७ ४११७

मॅनेजमेंट ४७२० ५४९

अल्पसंख्याक १०६८३ २३३७

कॅप ८४१४० २३५४१

एकूण १०७०३० ३०५४४

------------