शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाचा अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:22 IST

पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा  चौघांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन परिसरातील एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरा वर्षांची ही मुलगी एका शाळेत शिकत आहे. फिर्यादी समुपदेशक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत गेल्या होत्या.  मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’विषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर २०२० मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिचा १४ वर्षाच्या मोठ्या भावाने तिच्याबरोबर अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध करून धमकी दिली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले, तर मे २०२१ मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.गुंडाचा १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कारघरी जात असलेल्या १२ वर्षांच्या मुलीला भररस्त्यातून ओढून घरी घेऊन जात तिच्यावर गुंडाने बलात्कार केला. दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (रा. जनता वसाहत पुणे) याला अटक केली आहे. अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शेख याने १२ वर्षांच्या मुलीला धमकावून वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.