शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलासाठी महिलेचा बळी; तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2024 16:50 IST

तरुणाने घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत असल्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून महिलेवर कोयत्याने वार केले

सुपे (बारामती) : वीज बील जास्त येते, घरच्या वीज मीटर त्वरीत तपासावा अशी मागणी करत महावितरणने दुर्लक्ष केल्याने एका तरुणाने वीज उपकेंद्रात जाऊन जाब विचारत असताना तेथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मोरगाव येथे सकाळी ११ च्या दरम्यान घडली. मात्र महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

अभिजीत पोटे ( रा. मोरगाव ) असे कोयत्याने वार केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी यास त्वरीत ताब्यात घेवुन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रिंकु राम थिटे ही मोरगाव वीज  उपकेंद्रातील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असुन उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले होते. मात्र पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.        पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मागिल आठ दिवसापुर्वी पोटे याने वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांच्या घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरीत तपासण्यात यावा याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी ( दि. २४ ) सकाळी ११ च्या दरम्यान जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला. अधिक तपास सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीmahavitaranमहावितरणelectricityवीजWomenमहिला