शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० एप्रिलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:43 IST

मतदानाच्या दिवशी दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी गोंधळामुळे पुढे ढकलले होते मतदान

पुणे : मतदानाच्या दिवशी दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे. पुणे स्टेशनजवळच्या सहकारी संघ सभागृहात दुपारी बारा वाजता मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.    सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १९ तारखेला राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या बाजुने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा होता. त्यावेळी मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजप पुरस्कृत सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. या गोंधळाचा व्हिडिओ प्रसारीत झाला होता. त्यात भाजप पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले टेबल उधळून देताना दिसत आहेत. भाजप पुरस्कृत उमेदवारांनी अमोल घुले यांनी मतदानावेळी बंदुक रोखून धमकी दिल्याचे सांगितले. या प्रकरणी घुले यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

..................................

निवडणुकीत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच, निवडणुकीशी संबंधित व्यक्तींनाच मदतान केंद्राच्या आवारात सोडले जाईल.- आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी 

टॅग्स :Puneपुणे