शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

‘सहस्त्रक मतदारांचा’ शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:02 IST

‘सहस्त्रक मतदारांचा’ (मिलेनियम वोटर्स) शोध घेऊन अधिकाधिक नोंदणी करण्याच्या सूचना केंद्रिय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवयाची १८-१९ वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदार नाव नोंदणीसाठी प्रवृत्त होतील, अशा दृष्टीने उपक्रमप्रत्येक राज्यात सरासरी २ हजार तर प्रत्येक जिल्ह्यात १०० याप्रमाणे असावेत सहस्त्रक मतदार

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान ‘सहस्त्रक मतदारांचा’ (मिलेनियम वोटर्स) शोध घेऊन अधिकाधिक नोंदणी करण्याच्या सूचना केंद्रिय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. २१ व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी ज्यांचा जन्म झाला आहे आणि ज्यांच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होत आहेत अशा मतदारांनी पुढे येण्यासाठी प्रोत्साहनपर मोहीम आखण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक प्रमुख मोनिका सिंग यांनी दिली.अशा मतदारांना शोधून त्यांची मतदार यादीत नाव नोंदविणे तसेच, ज्यांचे अर्ज मतदार यादीत आलेले आहेत तसेच ज्यांची नावे नावे अंतिम मतदार यादीत येणार आहेत अशा मतदारांची नावे शोधून त्यांचा राष्ट्रीय मतदार दिवसाला सत्कार करण्यात येणार आहे. वयाची १८ ते १९ वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदार नाव नोंदणीसाठी प्रवृत्त होतील, अशा दृष्टीने उपक्रम राबविण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. भारतामध्ये दरदिवसाला ७४ हजार मुलांचा जन्म होतो. प्रत्येक राज्यामध्ये सरासरी दोन हजार तर प्रत्येक जिल्ह्यात १०० याप्रमाणे सहस्त्रक मतदार असावेत असे अपेक्षित आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळ व सोशल मीडियाच्या माध्यमातून सहस्त्रक मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत, रुग्णालये, जन्ममृत्यूचे दाखले देणारे अधिकारी आदींच्या माध्यमातून या मतदारांचा शोध घेतला जाणार आहे. जे सहस्त्रक मतदार नोंदणी करतील त्यांचा घरी जाऊन मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून सत्कार केला जाणार आहे. यासोबतच राष्ट्रीय मतदार दिवस २०१८ रोजी तरुण मतदारांच्या समवेत  ‘मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे’ असे लिहिलेला खास बॅचही त्यांना देण्यात येणार आहे. अशा सहस्त्रक मतदारांनी त्यांची छायाचित्र व मतदार ओळखपत्र त्यांच्या फेसबुक पेजवर टाकावे आणि निवडणूक अधिका-यांना टॅग करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत या मतदारांना वैयक्तिक स्वरुपाची प्रमाणपत्रेही देण्यात येतील. सहस्त्रक मतदारांची त्यांच्या महाविद्यालयात अथवा अन्य ठिकाणी ‘कॅम्पस अ‍ॅम्बॅसीडर’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या ‘निवडणूक साक्षरता क्लब’मध्ये पहिला सदस्य म्हणून नोंद करण्यात येणार आहे. जे मतदार शैक्षणिक प्रवाहात समाविष्ट नसतील त्यांना चुनाव पाठशालामध्ये नोंदविण्यात येणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे