शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:25 IST

मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सात -आठ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

देहूरोड : मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सात -आठ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.सुभान ऊर्फ शाबीर अमीन सोलंकी (वय १७, रा. गांधीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र चेतन ऊर्फ सोन्या बाळू पांडे (वय २०, रा. देहूगाव) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश बिडलान व त्याच्याबरोबर असलेले सात-आठ अनोळखी साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री अंकुश बिडलान यास मारहाण केल्याच्या कारणावरून बिडलान व त्याचे अनोळखी सात ते आठ साथीदारांनी चेतन पांडे याचा मित्र सुभान ऊर्फ शाबीर यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारून ठार मारले. फिर्यादी चेतन पांडे यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे अधिक तपास करीत आहेत. सुभानवर देहूरोड व तळेगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा