शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

आनंदाची बातमी! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; 'एल निनो' झाला होता विलंब

By नितीन चौधरी | Updated: June 8, 2023 14:44 IST

मॉन्सूनच्या आगमनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची खोली दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या मध्यभागापर्यंत पोचली आहे...

पुणे : सहसा १ जून रोजी दाखल होणारा मॉन्सून यंदा एल निनोच्या सावटाखाली अखेर गुरुवारी (दि. ८) केरळमध्ये एक आठवड्याच्या अंतराने दाखल झाला आहे. गेल्या दोन दशकांचा विचार करता केवळ दोनदाच मॉन्सून आठ जूननंतर केरळमध्ये दाखल झालेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या २४ तासांत मॉन्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्येकडील राज्यांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 

केरळमध्ये चांगला पाऊसमॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी मॉन्सून केरळमध्ये सात दिवसांच्या उशीराने दाखल झाला. त्यासोबतच मॉन्सूनने दक्षिण व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तमिळनाडूचे काही प्रदेश, कौमारीनचा संपूर्ण प्रदेश, मन्नारचे आखात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, मध्य व ईशान्य भाग व्यापला आहे.

मॉन्सूनच्या आगमनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची खोली दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या मध्यभागापर्यंत पोचली आहे. या वाऱ्यांची तीव्रता खालच्या स्तरात वाढली आहे त्यामुळेच गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. 

प्रगतीस अनुकुल स्थितीहवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून तो मध्य अरबी समुद्राच्या आणखीन काही भागांमध्ये, केरळच्या उर्वरित भागांमध्ये तसेच तमिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम मध्य व ईशान्य भागात मॉन्सून पोचणार आहे.

गेल्या दोन दशकांचा विचार करता २०१६ व २०१९ या दोन वर्षीच मॉन्सून आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. २०१९ ला मॉन्सून उशिरा दाखल झाला होता तरी देखील त्यावर्षी पाऊस सर्वत्र चांगला झाला होता. त्यामुळेच मॉन्सूनच्या उशिरा आगमनाचा त्याच्या वितरणावर परिणाम होत नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. १९९७ हे वर्ष एल निनोचेे वर्ष म्हणून ओळखले गेले. त्यावर्षी मॉन्सून १२ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र उर्वरित देशांमध्ये त्याचे वितरण सुरळीत राहून देशभरात १०२ टक्के पाऊस झाल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसKeralaकेरळ