पुणे : शैक्षणिक,व्यावसायिक व संशोधक क्षेत्रातील तज्ज्ञांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटचे (डीएसआय) संचालक व उपाध्यक्ष म्हणून डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर निवडून आले आहेत. त्यांनी चीनचे ट्रीटीश लाओसिरिहौंग्तोंग यांचा पराभव केला.डीएसआय ही संस्था अमेरिकेतील पाच प्रादेशिक विभागात तसेच मेक्सिको,एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात कार्यरत आहे. देशभरातील आयआयएम, आयआयटी, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक या संस्थेचे सदस्य आहेत.या संस्थेच्या संचालक व उपाध्यक्ष पदासाठी जागतिक पातळीवर निवडणूक लढवली जाते. भारतातून निवडणूक लढवून निवडून येणारे खेडकर हे तिसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी भिमराया मैत्री आणि डॉ. रविकुमार जैन हे डीएसआयच्या उपाध्यपदी निवडून आले होते.खेडकर म्हणाले, जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडीमुळे प्राप्त झाली आहे. भारताचे प्रतिनिधित्त्व करताना आपली विद्यापीठे जागतीक पातळीवरीत पहिल्या पाचशे विद्यापीठांच्या क्रमवारीत का येत नाहीत? भारतातील विद्यापीठांंमध्ये कोणत्या प्रकारचे संशोधन वाढविणे गरजेचे आहे? देशाचा सशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे.? याबाबतची माहिती जागतिक स्थरावर काम करताना मिळू शकेल. तसेच पुढील काळात त्यादृष्टीने काम करून देशाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करता येतील.
अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:50 IST
डीएसआय ही संस्था अमेरिकेतील पाच प्रादेशिक विभागात तसेच मेक्सिको,एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात कार्यरत आहे.
अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर
ठळक मुद्देदेशभरातील आयआयएम, आयआयटी, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक या संस्थेचे सदस्य भारतातून निवडणूक लढवून निवडून येणारे खेडकर ठरले तिसरे व्यक्ती जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडीमुळे प्राप्त