शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा, इंदापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:15 IST

जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर - जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.सुनील अजिनाथ खबाले, महादेव कृष्णा खबाले, तुषार महादेव खबाले, ओंकार रावसाहेब खबाले, सुवर्णा महादेव खबाले, संगीता रावसाहेब खबाले, स्वप्नाली प्रदीप खबाले, दीपाली सुनील खबाले (सर्व रा. खबालेवस्ती) अशी आरोपींची नावे आहेत.सोमनाथ रामदास खबाले (वय ३२, रा. खबालेवस्ती) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.आज सकाळी ११ च्या सुमारास खबालेवस्ती येथील फिर्यादीच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये जमीन गट क्र. २९ मधील फिर्यादीच्या मालकीच्या शिल्लक जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून वाद होत होते. फिर्यादीच्या जमिनीमध्ये सुनील खबाले याचे घर आहे. त्यांच्या राहत्या घरासमोरची जागा तो वापरत आहे.आज सकाळी ११च्या सुमारास फिर्यादी व त्याचे आई-वडील शेताच्या बांधावर दगड रचण्यासाठी बांधाच्या कडेला ट्रॅक्टरमधून दगड खाली करून घेत होते. त्या वेळी तलवार, गज, कोयते व दगड घेऊन आरोपी तेथे आले. तुमचा या जागेत काही संबंध नाही. ती जागा आमचीच आहे, असे म्हणत त्यांनी या तिघांवर शस्त्रांनी हल्ला चढविला. फिर्यादीचा भाऊ नवनाथ त्यांना सोडविण्यासाठी आला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली, अशा आशयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार दिनेश कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा