शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

दापोडी येथे बिबट्याचा धुमाकूळ, आठ जणांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:56 IST

दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले.

केडगाव - दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.या हल्ल्यामध्ये कैलास अनंता पवार (वय ३५), शकील जमीन शेख (वय ६५), बबलुकुमार विक्रमसिंग (वय ३८), रणजित सुशील गोपाल (वय ८), अश्रुबा रंगनाथ चव्हाण (वय ६०), अप्पा बाबा सातपुते (वय ६६), दादा गायकवाड (वय ४०), संतोष (वय ४०, पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. टुलेवस्ती व इंगळेवस्ती) यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ५ परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. हे मजूर गुºहाळघरावर कामाला होते. यातील कैलास पवार हे गंभीर जखमी असून, त्यांच्या डोक्याला बिबट्याने चावा घेतला आहे. पवार यांना ३५ टाके पडले आहेत. तसेच दादा गायकवाड यांच्या बोटाचा बिबट्याने लचका तोडला असून बोट तुटले आहे. या घटनेनंतर वनविभागाने सुरुवातीस बिबट्याऐवजी पिसाळलेले कुत्रे असेल असे सांगितले. सोमवारी एका वीटभट्टीवरील ओल्या विटेवर बिबट्याच्या पायाचा ठसा आढळल्याने वनविभागाची धावाधाव झाली. सायंकाळी ६ च्या सुमारास या परिसरात पिंजरा लावण्यात आला. २ गंभीर जखमींना पुणे येथे खासगी रुग्णालयात तर इतरांना केडगाव परिसरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पारगाव (ता. दौंड) येथील गोलांडेवस्ती येथे २ महिन्यांपूर्वी एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे