शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अविनाश बागवे यांच्यासह आठ सदस्य पडले पुणे महापालिकेच्या स्थायी समितीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:36 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा, दर वर्षी अर्ध्या सदस्यांना पडावे लागते बाहेरभाजपच्या इच्छुक सदस्यांकडून सुरु होईल जोरदार मोर्चेबांधणी

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. या चिठ्ठ्यांमध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेना एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याला बाहेर पडावे लागले.महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची स्थापन करण्यात आली, याला एक वर्षे पूर्ण झाले. स्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो, परंतु दर वर्षी अर्ध्या म्हणजे ८ सदस्यांना समितीतून बाहेर पडावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व १६ सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या करून ८ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातात. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी आठ सदस्यांच्या चिठ्ठ्या काढल्या. यामध्ये भाजपच्या स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, हरिदास चरवड, योगेश समेळ, बॉबी टिंगरे या चार सदस्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे आणि प्रिया गदादे या दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. काँगे्रसचे अविनाश बागवे, शिवसेनेचे नाना भानगिरे यांना देखील बाहेर जावे लागले आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य बाहेर पडले तेवढ्याच नविन सदस्यांना आता स्थायी समितीमध्ये सधी मिळणार आहे. यामुळे स्थायी समितीत आपली वर्णी लावण्यासाठी भाजपच्या इच्छुक सदस्यांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु होईल.सध्या स्थायी समितीमध्ये पक्षीय बलाबलनुसार भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक एक सदस्य यांचा समावेश आहे. आता भाजपला नव्याने चार सदस्यांची, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एक सदस्यांची स्थायी समितीवर नियुक्ती करावी लागणार आहे. फेबु्रवारीमध्ये होणाऱ्या मुख्यसभेत आठ सदस्यांची नावे सादर करून त्यानंतर नविन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे