शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:00 IST

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत.

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. तिला सक्षम करण्यासाठी तसेच तिचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पालकांनी सर्व ते प्रयत्न केल्यास महिलांनादेखील समाजात मानाचे स्थान मिळू शकेल, असा विश्वास दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गुलामगिरीचे जीवन जगत असलेल्या महिलांसाठी घराचा उंबरठा ओलांडून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे पुणे शिक्षणाचे माहेर ठरले असून शिक्षणाच्याबाबत अनेक अनोखे उपक्रम या ठिकाणी झाले आहेत. शिक्षणाची दारे खुली करून तिला तिचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी सावित्रीबार्इंनी दिली. मात्र आजही महिलांना समाजात सन्मानाचे स्थान नाही. समाजाचे सोडा घरातदेखील तिला दुय्यम दर्जा दिला जातो. घरात धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्याची सर्व तयारी महिलांना करावी लागते.स्वयंपाकापासून पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवण्याची जबाबदारी ती पार पाडते. मात्र पूजेचे ताट हे कुटुंबातील पुरुषांच्याच हाती असते. पण ‘लोकमत’च्या तीचा गणपतीमध्ये गेली सहा वर्षे पूजेचे ताट हे तिच्या हाती आहे, हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यातून समाजाचे परिवर्तन घडणार आहे. कुटुंबातील महिलेमुळे मी समाजात काही तरी करू शकलो, अशी भावना या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या मनात निर्माण होणार आहे. शोषित आणि पीडित महिलांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लोकमत करीत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. शिवाजीमहाराजांच्या मागे जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या मागे माता रमाबाई, तर महात्मा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचा पाठिंबा होता.समाजात एवढे परिवर्तन होत असतानाही महिला सुरक्षित नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे समोर येते. या घटना ऐकून मनाचा थरकाप होत असून अत्याचार करणाऱ्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होत आहे. समाजाला दिशा देणारे शिक्षणदेखील त्याला अपवाद राहिले नाही. त्यातून पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे अधोरेखांकित होते. हे सर्व बदलण्यासाठी आणि महिलांना अधिक सुरक्षित करण्यासाठी या मानसिकतेत आणि पुरुषांच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे.स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. या बदलाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी. मुलांवर लहानपणापासूनच तसे संस्कार झाले तर महिला नक्कीच सुरक्षित होईल. केवळ मुलगाच नव्हे, तर मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे, असा विचार पसरायला हवा. ग्रामीण भागात असा बदल रुजवणे गरजेचे आहे. परक्याचे धन म्हणून तिच्यावर होणारे अन्याय थांबायला हवेत. हुंड्यासाठी तिला जाळले जाते, विहिरीत ढकलले जाते, तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, अशी स्थिती आहे. या सर्व पीडित महिला ‘लोकमत’च्या तीच्या गणपतीपासून प्रेरणा घेतील आणि आम्ही अबला नसून सबला आहोत, असे दाखवून देऊ शकतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून मला या चळवळीमध्ये सामील होता आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल ऐकले आहे, अनुभवले आहे. तीचा गणपती या उपक्रमामध्ये सर्व महिला हातात हात घालून काम करीत आहेत, सर्व जबाबदाºया समर्थपणे पेलत आहेत. एकमेकींना पाठिंबा देऊन एकमेकींची शक्ती बनत आहेत. महिलांनी एखादे विधायक कार्य करायचे ठरवल्यास काय होऊ शकते, याचे सकारात्मक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘लोकमत’तर्फे आयोजित तीचा गणपती हा उपक्रम आहे.

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या