शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर

By admin | Updated: December 30, 2014 22:51 IST

डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात.

बारामती : डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात. मात्र यंदा या बाजारपेठेवर सोशल मिडीयाचा प्रभाव जाणवत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छा पत्रांची मागणी घटली असल्याचे चित्र आहे.नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छापत्रांची देवाण-घेवाण करणे हा व्यावसायिक आणि नागरिकांचा एक शिरस्ता आहे. मात्र मागील काही वर्षापासून शुभेच्छापत्र देण्यापेक्षा ही व्हाटस्अप, फेसबुक, ट्वीटरच्या माध्यमातुन नववर्षाच्या शुभेच्छा देणेच लोक पसंत करत आहेत. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ‘ब्लॅक आॅउट डे’म्हणून ओळखले जातात. असे असतानाही शुभेच्छापत्रांपेक्षाही या सोशल मिडीयावरून संदेशाची देवाण घेवाण सुरूवात झाली आहे.या शुभेच्छापत्रांच्या खरेदीला डिसेंबर अखेरीस सुरूवात होते.मात्र यंदा मागील वर्षाच्या तुलनेत २० ते २५ टक्के घट झाली आहे. वर्षातील व्हेलेंटाईन टे, दिवाळी, ख्रिसमस या बरोबरच नववर्षाच्या निमित्त शुभेच्छापत्र देण्यात येत असतात.मात्र या शुभेच्छापत्रांच्या खरेदीवर सोशल मिडीयाच्या संदेशांमुळे परिणाम झाला आहे. शुभेच्छा पत्रांच्या मागणीत घट झाली आहे. मात्र, शुभेच्छा पत्रांद्वारे थेट नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा विशिष्ट ग्राहक वर्ग आजही मागणी करीत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. नववर्ष साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे.तसेच त्याच्या शुभेच्छा देण्यातमध्ये सुद्धा पडलेला आहे.सोशल मिडीयासोबतच ‘ई-मेल’च्या साहाय्याने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. २५ ते ५० रूपयांच्या शुभेच्छापत्रांपेक्षा या अ‍ॅप्स मुळे शुभेच्छा देणे अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे.त्यातच या संदेशाची गहाळ तसेच उशिरा पोहच मिळत नसल्याने ते पाठविणे अधिक सोयीचे ठरत आहे. (वार्ताहर)४३१ डिसेंबर, १ जानेवारी रोजी मोबाईल मॅसेजसाठी विशिष्ट दर आकारण्यात येणार आहेत. या दोन्ही दिवशी कोणतेही एसएमएस ‘पॅक’ कार्यरत नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी (दि. ३०) ‘अ‍ॅडव्हान्स’ एसएमएसद्वारे नुतन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या . ४ नववर्ष साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे.तसेच त्याच्या शुभेच्छा देण्यातमध्ये सुद्धा पडलेला आहे.यंदा मागील वर्षी पेक्षा फार कमी प्रमाणात शुभेच्छापत्रांची खरेदी होत आहे.युवा वर्गातुन ही खरेदी कमी झाली आहे.मात्र नोकरदार वर्गातुन आर्वजुन ही शुभेच्छापत्रे विकत घेतली जात आहेत.-राजेंद्र आहेरकर,बारामती