शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:16 IST

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात.

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १९ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी घनदाट जंगल केवळ ७-८ टक्के भूभागावर आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या सध्या आपल्यासमोर ‘आ’वासून उभी आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. सामाजिक, तसेच स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास शासनाच्या योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात काम करताना तेथील नागरिकांच्या गरजा, अनुभव यानुसार कामाचे नियोजन करता येते. वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये स्थानिकांवर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवल्यास योजना यशस्वी होण्यास मदत होईल. प्लॅस्टिकची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी योग्य आहे, असे वाटते. मात्र, प्लॅस्टिकला ठोस पर्याय निर्माण व्हायला हवेत.मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई मार्गक्रमण करीत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, मुलींसाठी स्वच्छतागृहे, जलशुद्धीकरण यंत्रे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी माध्यमांतून कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वनविभागाच्या जागेचा परिसर आणि ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. पिंपळाचे वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुढील तीन वर्षे रोपांचे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे. वनराईतर्फे पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचनसाहित्य, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालने असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतिपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शनाद्वारे होईल, असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रदर्शनात रानभाज्यांची ओळख, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन याद्वारे नागरिकांना कृतिपर विषयातून त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या