शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षक, अंगणवाडीसेविकांच्या कौशल्य विकासासाठी ‘आकार’, बालकांना मिळणार प्रभावी शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:49 IST

अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे.

पुणे  - अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातर्फे ‘आकार’ बालशिक्षणाचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील, तसेच शहारातील पर्यवेक्षक यांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून याद्वारे त्यांच्यातील कोशल्य विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.पूर्वप्राथमिक स्तरांवरील बालकांसाठी शास्त्रशुद्ध बालशिक्षण देणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे राज्य शासनाने ठरवले. त्यानुसार हा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण या संस्थेकडे देण्यात आली. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील अंगणवाडीतील बालके डोळ्यासमोर ठेवून ‘आकार’ बालशिक्षण हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. बाल्यावस्थेतील बालकांची वैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या मानसिकतेचा विचार या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यानंतर २०१४ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आढाव्यानुसार या उपक्रमाला ‘आकार बालशिक्षणक्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असे शेळके म्हणाल्या.अंगणवाडीमधील मुलांना हाताळताना, तसेच त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी योग्य कौशल्याची आवश्यकता असते. लहान मुले कशा प्रकारे बोलतात, त्यांच्या आवडी-निवडी अशा विविध गोष्टी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांना आत्मसात करणे गरजेचे असते. मात्र, याबाबतचे ज्ञान तसेच कौशल्य सेविका आणि मदतनीस, तसेच पर्यवेक्षक यांनाही नसल्यामुळे या बालकांना शिकवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र, आकार या उपक्रमाअंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील २०२ पर्यवेक्षकांना हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ६ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर हे पर्यवेक्षक जिल्ह्यातील अंगणवाडीमधील सेविकांना देणार आहे. त्यामधून बालकांचा सर्वांगीण विकास साधू शकतो, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.अंगणवाडीतील मुलांचा सर्वांगीण विकास या उपक्रमामुळे होण्यास मदत होणार आहे. यामुळे ‘आकार’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यवेक्षक आणि अंगणवाडीसेविका यांना या उपक्रमाअंतर्गत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण विभागजिल्ह्यात २०२ पर्यवेक्षक आहेत. एका पर्यवेक्षका अंतर्गत ४० अंगणवाड्या येतात. सुरुवातीला या पर्यवेक्षकांना ६ दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत देण्यात येणार आहे. त्यानंतर हे पर्यवेक्षक अंगणवाडीसेविकांना, तसेच मदतनिसांना प्रशि़क्षित करणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या