शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pune | नायब तहसीलदारांच्या संपाचा कामकाजावर परिणाम; वेतनवाढीसाठी बेमुदत संप

By नितीन चौधरी | Updated: April 3, 2023 20:25 IST

जिल्ह्यातील सुमारे ११४ जण या संपात उतरले असून याचा जिल्हाधिकारी कार्यलयातील कामकाजावर अंशत: परिणाम झाला...

पुणे : राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग २ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग २ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने सोमवारपासून (दि. ३) बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सुमारे ११४ जण या संपात उतरले असून याचा जिल्हाधिकारी कार्यलयातील कामकाजावर अंशत: परिणाम झाला.

नायब तहसीलदारांचे ग्रेड पे ४३०० ते ४८०० रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत राज्य सरकारकडे १९९८ पासून आजवर वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याने संपाचे हत्यार उगारण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले.

या संपाचा परिणाम स्थानिक तालुका पातळीवर होणार आहे. पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजनेसह शेतकऱ्यांच्या संबंधित जमिनीची प्रकरणे नायब तहसीलदार हाताळत असतात यामुळे हि सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच तहसीलदारांकडे असलेल्या महसुली प्रकरणातील सुनावणीसाठी आता पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या संपकाळात निवडणूक व नैसर्गरिक आपत्ती या दोन कामांना वगळण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेजिल्ह्यातील सुमारे ११४ जण या संपात सहभागी झाले आहेत. यातील सुमारे ५० जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन निदर्शने केली. त्यानंतर लेखणी बंद आंदोलन केले, अशी माहिती संघटनेचे शेळके यांनी दिली.

तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन केले असले, तरी जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. महत्त्वाच्या निर्णयांच्या फाइल जिल्हाधिकारी कार्यालयात मागवून घेण्यात आल्या असून त्यावर विहित कालावधीत निर्णय घेतले जातील.- हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड