शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्था थकबाकीदार, सिंहगड इन्स्टिट्यूटने थकविले चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:46 IST

पुण्यातील बड्या शैक्षणिक संस्थांनी पुणे महापालिकेच्या तब्बल ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांचा कर थकविला आहे.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : पुण्यातील बड्या शैक्षणिक संस्थांनी पुणे महापालिकेच्या तब्बल ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांचा कर थकविला आहे. यामध्ये सर्वाधिक ४ कोटीपेक्षा अधिक थकबाकी एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटकडे असल्याचे समोर आले आहे.शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमाविणाºया संस्थांकडून शासनाच्या विविध विभागांचे कर भरताना पळवाटा काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या मार्चअखेर जवळ आल्याने मिळकतकराची अधिकाधिक थकबाकी वसूल करण्याची मोहीम मिळकतकर विभागाने अधिक तीव्र केली आहे. थकबाकी वसुलीसाठी नियुक्त केलेल्या पथकांकडून प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांना नोटिसा देणे, जप्ती करणे व मिळकतींना सील ठोकण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. परंतु अद्यापही अनेक बडे थकबाकीदार प्रशासनाच्या गळाला लागलेले नाहीत.शहरातील सुमारे ५४ शैक्षणिक संस्थांकडे ६ कोटी ५४ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २६ संस्थांनी एक लाखांपेक्षा अधिक कर थकविला आहे. सिंहगड संस्थेच्या मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आदी विविध शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटीपेक्षा अधिक कर थकविला आहे. या सर्व संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.>योजनांना प्रतिसाद नाही : सामान्यांवर मात्र कारवाईमहापालिकेच्या वतीने थकबाकीदारांनी लाखो रुपयांचा थकीत कर भरावा, यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. वेळेत कर भरणा-यांना करामध्ये सूटदेखील दिली. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणाºया मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शहरातील अनेक बड्या शैक्षणिक संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Puneपुणे