शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी शि़क्षण हाच पर्याय : रश्मी शुक्ला; ‘मिशन परवाज’चे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:58 IST

मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

ठळक मुद्देमिशन परवाजच्या वतीने प्रशिक्षण देऊन दाखवणार उत्तम मार्ग : रश्मी शुक्लाशिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते : रवींद्र सेनगावकार

पुणे : वृक्षाची वाढ उत्तम होण्यासाठी त्याची लहान असताना काळजी घ्यावी लागते पण ते मोठे झाले की मजबूत होते. त्याचप्रमाणे मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.  पुणे शहर पोलीस आयोजित मिशन परवाज उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. मिशन परवाज या मिशनद्वारे बेरोजगार मुसलमान मुलांना लेखी परीक्षा आणि मुलाखत कशी घ्यावी याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या समारंभात पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, पोलीस उपायुक्त संजय कुमार बाविस्कर, मौलाना काझमी, मौलाना इंद्रिस आदी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच पाहिजे. त्यातून त्यांनाच फायदा होत आहे. पोलीस भरतीच्या वेळी मुले शारीरिकदृष्टया तर पास होतात परंतु लेखी परीक्षेत नापास होतात तर आपण त्यांच्या लेखी परीक्षेवर व इतर कमजोरीवर लक्ष देणे गरजेचे आहे. या मिशन परवाजच्या वतीने मुलांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्याना उत्तम मार्ग आम्ही दाखवणार आहोत. रवींद्र सेनगावकार म्हणाले, मिशन परवाजमुळे आयुष्यात जेवढी मुले पुढे जातील तेवढी मुले नक्कीच देशासाठी काहीतरी करून दाखवतील. या मिशनच्या वतीने तरुण मुलांना एक संदेश देणार आहे की त्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले जास्तीत जास्त लक्ष शिक्षणाकडे दयावे. शिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते व विचारही बदलतात. आपले विचार उत्तम असतील तर प्रगती निश्चितच होते.समारंभाचे प्रास्तविक बसवराज तेली आणि आभारप्रदर्शन बाजीराव मोहिते यांनी केले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPuneपुणे