शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 19:49 IST

शिक्षकांना मानसिक, आर्थिक त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे़.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी न्यायालयात खोटी लेखी माहिती दाखल केल्याचे या फिर्यादीत नमूद

पुणे: मॉडर्न कॉलेजच्या दोन शिक्षकांचा निलंबनाचा कालावधी उलटून गेल्यावर सुध्दा त्यांना कामावर न घेत न्यायालयाची दिशाभूल करुन शिक्षकांना मानसिक, आर्थिक त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे़.याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़. प्रा़ दिलीप खंडाळे यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा़. दिलीप खंडाळे आणि प्रा़.लक्ष्मीकांत शेरखाने हे मॉडर्न महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत़. संस्थेने त्यांना निलंबित केले होते़. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी संस्थेला आपल्या निलंबनाचा कालावधी संपला असून आम्हाला हजर करुन घ्या, अशी विनंती केली़.त्यानंतरही त्यांना हजर करुन न घेता पगारही दिला नाही़. त्यानंतर संस्थेने या दोघांना १९ आॅगस्ट २०१६ रोजी बडतर्फ केले़. या घटनेनंतर त्यांनी शाळा न्यायाधिकरण यांच्या न्यायालयात अपिल केले़. विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर व अन्य दोघांनी न्यायालयात वेतनवाढ रोखलेली नसताना खोटी व खोडसाळ माहिती देऊन न्यायाधिकरणाची दिशाभूल केली़ . त्याआधारे उच्च न्यायालयाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला़. तेव्हापासून आम्हाला पगार मिळालेला नाही़ . जातीय द्वेषातून आम्हाला वागणूक देत असून आमचे नुकसान व्हावे, या हेतूने या अधिकाऱ्यांनी न्यायालयात खोटी लेखी माहिती दाखल केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़. सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड अधिक तपास करीत आहेत़ .

 

टॅग्स :Puneपुणेmodern collegeमॉडर्न महाविद्यालयProfessorप्राध्यापक