शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल विकले दीड लाख प्रतिलिटर! उद्योजकाला गंडा, नायजेरियन टोळीने उकळले १ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:22 IST

भारतात मिळणाºया हर्बल आॅईलला ब्रिटनमधील (यूके) कंपनीकडून चांगला भाव देण्यात येतो. या तेलाचा पुरवठा केल्यास चांगला नफा मिळेल, असे पटवून देत नायजेरियन टोळीने तब्बल १ लाख ४५ हजार रुपये प्रतिलिटर दराने

पुणे : भारतात मिळणाºया हर्बल आॅईलला ब्रिटनमधील (यूके) कंपनीकडून चांगला भाव देण्यात येतो. या तेलाचा पुरवठा केल्यास चांगला नफा मिळेल, असे पटवून देत नायजेरियन टोळीने तब्बल १ लाख ४५ हजार रुपये प्रतिलिटर दराने खाद्यतेलाची विक्री केली. असे १ कोटी ४ लाख ४७ हजार किमतीचे १२० लिटरचे तेल व्यापाºयाला खरेदी करण्यास भाग पाडले. सायबर विभागाने मोठ्या कौशल्याने हे प्रकरण उघडकीस आणत दोघा नायजेरियन तरुणांना अटक केली असून, टोळीतील अन्य दोन व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने केरळ, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथेदेखील ६ व्यक्तींची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.अमरा ओबिआसोगु ऊर्फ रॉबर्ट स्पिफ ऊर्फ फ्रँक (वय ३०, मूळ रा. नायजेरिया, सध्या रा. पनवेल), इकेनी उनाशुक्वू (वय ३०, मूळ नायजेरिया) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी चिंचवडमधील एका व्यापाºयाने तक्रार दिली होती. व्यापाºयाच्या फेसबुक खात्यावर तीन महिन्यांपूर्वी आॅलिव्हिया जॉन्सन या महिलेच्या नावाने व्यापाºयाला मैत्रीची विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर तिने सलगी वाढवित आपण ब्रिटनस्थित अ‍ॅझिलिस फार्म इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड कंपनीत खरेदी-विक्री अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. ही कंपनी उडरा लिक्विड हर्बल आॅईल ५ हजार डॉलर प्रतिलिटर भावाने विकत घेते. तेच आॅईल भारतात २ हजार डॉलर प्रतिलिटर किमतीला मिळते. मी कंपनीबरोबर तुमचा १५० लिटर्सचा करार करून देते. तुमच्या नफ्यात मला ३० टक्के वाटा द्यावा, असे तिने सांगितले.या आॅलिव्हिया जॉन्सनने या व्यापाºयाला भारतातील काही पुरवठादारांचे दूरध्वनी क्रमांक दिले. भारतातील या व्यापाºयाने १ लाख ४५ हजार रुपये प्रतिलिटरला तेल देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार एक लिटर तेल कुरियरने पाठविण्यात आले. संबंधित कंपनीचा फिलीप नावाचा प्रतिनिधी तेलाची गुणवत्ता चाचणी घेण्यासाठी पुण्यात आला होता. त्यानंतर संबंधित कंपनीने तेल चांगले असल्याची मोहोरउमटविली.त्यानंतर संबंधित कंपनीला पुरवठा करण्यासाठी या व्यापाºयाने १२० लिटर तेल खरेदी केले. मात्र समोरील कंपनी त्याचे पैसे देत नव्हती. दुसरीकडे आणखी तेल घेण्यासाठी व्यापाºयाकडे तगादा सुरू होता.व्यापाºयाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरणाचे सायबर गुन्हे विभागाने विश्लेषण केले. त्यानुसार महिलेचे नाव वापरून नायजेरियन टोळी व्यापाºयाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. व्यापाºयाला खरेदी करण्यास भाग पाडलेले तेल खाद्यतेल होते. याच टोळीतील व्यक्तीकडून त्याचा पुरवठा आणि गुणवत्ता चाचणी करण्यात आली. या टोळीकडून २० मोबाईल, २ लॅपटॉप, ३ सिमकार्ड, ३ डोंगल, २ राऊटर, २ पासपोर्ट, १ पेनड्राईव्ह, ५ लिटर आॅईल असलेले कॅन जप्त करण्यात आले आहेत. या टोळीने जानेवारी २०१७ पासून मोबाईलमधून १६० वेगवेगळे सिमकार्ड वापरल्याचे सांगितले. या टोळीला एक महिला व एकाने साथ दिली असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पवार, सागर पानमंद, अस्लम अत्तार, अजित कुºहे, अमित औचरे, शाहरुख शेख, प्रसाद पोतदार, दीपक माने, दीपक भोसले, संतोष जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.व्यापाºयाने तेलाच्या खरेदीसाठी बँक खात्यात पैसे भरले होते. या टोळीने चेन्नईतील सहा आणि दिल्लीतील एका खात्यातून हे पैसे काढले आहेत. या खात्यांचे केवायसी तपासण्यात येत आहे. नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.- सुधीर हिरेमठ,पोलीस उपायुक्त 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे