शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

पर्यावरणपूरक लाकडाचे ‘आकाशदिवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:15 IST

एकीकडे महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकबंदी केली, तर दुसरीकडे सबंध भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.

- युगंधर ताजणेपुणे : एकीकडे महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकबंदी केली, तर दुसरीकडे सबंध भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. याचा फायदा मात्र स्थानिक कामगारांना होऊन त्यांच्यातील सर्जनशीलतेला संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा दिवाळीतील प्रमुख आकर्षण असणाºया आकाशदिव्यांची वेगवेगळ््या प्रकारे निर्मिती करण्यात आली आहे. सध्या बाजारात प्लॅस्टिकला पर्याय म्हणून चक्क लाकडी कंदील आले आहेत. एमडीएफ प्लायपासून बनविलेले हे कंदील पूर्णपणे विघटनशील अशा स्वरुपाचे आहेत.दिवाळीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना बाजारात खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्यामुळे दिवाळीच्या वेळी खरेदी करण्यात येणाºया विविध वस्तूंवर त्याचा परिणाम होईल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात बाजारात त्या वस्तुंना पर्याय उपलब्ध झाले आहेत. कागद, ज्यूट, कापड इतकेच नव्हे, तर बांबूपासूनदेखील आकर्षक व सुबक आकारातील कंदील आणि इतर वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.लाकडी आकाशदिव्यांची प्रथमच विक्री करणारे अमित बढाई यांंनी सांगितले, की एमडीएफ प्लायपासून आकाशदिवे तयार केले असून ते विघटनशील आहेत. लाकडाचा भुसा, हत्तीचे शेण व काही रसायनांचा वापर करून हे प्लाय बनविण्यात येते. गरजेनुसार ते वॉटरप्रुफदेखील करून घेता येते. २.५ एमएमपर्यंत जाडी असणाºया प्लायची गुणवत्ता व टिकाऊपणा हा त्याच्या जाडीवरून मोजला जातो. अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत ते तयार करता येतात.लाकडाबरोबरच ज्यूट, कापड आणि कागद यापासूनदेखील आकाशदिवे बनवले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ज्युटपासून आकाशदिव्यांचा व्यवसाय करणारे अजय चव्हाण म्हणाले, की ज्यूट, कापड व कागदापासून आकाशदिवे हाताने बनवावे लागतात. त्यात एका आकाशकंदिलाकरिता पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो. ज्यूटचे आकाशकंदील २५० पासून १२०० रुपयांपर्यंत आहेत, तर सिल्क प्लायपासून बनविण्यात आलेल्या कंदिलांची किंमत २५० पासून ७५० पर्यंत आहे. या आकाशकंदिलांमध्ये पेशवाई कंदील, न्यू लोटस कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.>आकाशदिव्यांना रंगवता येण्याची सोयलाकडी आकाशदिवे तयार करण्यासाठीचा कच्चा माल हा मुंबई व पुण्यातून खरेदी केला जातो.ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार या आकाशदिव्यांना रंगवता येण्याची सोय आहे. मात्र त्याकरिता केवळ स्प्रे कलरचा उपयोग करावा.आकर्षक रंगाच्या कागदांनीदेखील त्याची सजावट करता येते. सतत पाण्यात हे प्लाय भिजत राहिल्यास ते फुगून त्याचे विघटन होण्यास सुरुवात होते.आता बाजारात फुले, मोर, कलश यांच्या आकारातील आकाशकंदील बाजारात आहेत.>कागद, कापड आणि बांबूंच्या वस्तूंना पसंतीप्लॅस्टिकबंदी झाली. मात्र त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीवर काही परिणाम झाला असे नाही.त्यांना पर्यावरणपूरक वस्तुंचा पर्याय नसल्याने ते प्लॅस्टिक वस्तुंना प्राधान्य देत होते. मात्र आता कागद, कापड आणि बांबूंच्या दिवाळीत उपयोगी वस्तुंना चांगलीच मागणी आहे.विशेष म्हणजे ग्राहक त्याला पसंती देत आहेत. मातीच्या पणत्या, मेणाच्या सुगंधी पणत्या स्टीलच्या छोट्या वाटीत विक्रीस ठेवले आहेत.प्लॅस्टिकऐवजी स्टीलचा केलेला उपयोग ग्राहकांना आवडत असल्याचे बोहरी आळीतील विक्रेते कृष्णकुमार ठाकूर सांगतात.