शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणीपुरवठा योजनेला लागणार निवडणुकीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:28 IST

२४ तास पाणी अवघडच : वाहतूककोंडीच्या धास्तीने खोदाईला परवानगी देण्यास टाळाटाळ

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : महापालिकेच्या बहुचर्चित २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे. सध्या शहरहात जोरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात जलवाहिन्यांसाठी पुन्हा रस्ते खोदाई सुरू केल्यास संपूर्ण शहरात वाहतुक कोंडीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

जलवाहिन्यांचे पहिल्या टप्प्यातील सुमारे २५० किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूककोंडी होऊन नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या धास्तीने सत्ताधारी रस्ते खोदाईला परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु याचा फार मोठा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या मेट्रोसाठी खोदाई सुरू असून, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात जर या योजनेसाठी रस्ते खोदाईला मंजुरी दिली, तर मात्र शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही योजना लटकलेलीच आहे.तब्बल १६०० किलोमीटरहून अधिक खोदाई करावी लागणार1 शहरासाठी २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी संपूर्ण शहरात जलवाहिन्या टाकण्यासाठी तब्बल १६०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे.2यामध्ये पहिल्या टप्प्यात तातडीने २५० किलोमीटर रस्ते खोदाई करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने पथविभागाला दिला आहे.धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणारकिलोमीटरपेक्षा अधिक शहरामधील रस्ते खोदाई करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. यामुळे पथविभागाकडून हा प्रस्ताव आयुक्त आणि पक्षनेत्यांकडे पाठवला आहे. पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी अधिक रुंदीचे रस्ते खोदावे लागणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणते रस्ते घ्यायचे, येथील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, एकाच वेळी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाईचा निर्णय घेतल्यास शहरात वाहतूककोंडीचा पुरता बोजवारा उडणार आहे. त्यामुळे सध्या २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी देण्यास सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. परंतु आता परवानगी दिली नाही तर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून हाती घेतलेली महत्त्वाकांक्षी योजना रखडण्याची भीती व्यक्त होत असून, शहराला मोठा फटका बसू शकतो.दर वर्षी पाणीपट्टीत 15% वाढकर्जरोख्यांवर १५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंडशहराच्या महत्वाकांक्षी समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेसाठी पुणे महापालिकेला वर्षभरात १५ कोटी रुपये व्याजापोटी भरावे लागले आहेत़ योजनेचे काहीच काम झाले नसल्याने नाहक व्याज भरावे लागत आहे़ तीन हजार कोटींच्या या योजनेसाठी जून २०१७ मध्ये २ हजार २६४ कोटी रुपये कर्जाने उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून २०१७ मध्ये परवानगी दिली होती़शहरामध्ये २४ बाय ७ समान पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २४०० कोटी रुपयांचे कर्ज काढून योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पुणेकरांकडून पाणीपट्टीदेखील वाढवून घेतली जात आहे. परंतु आता रस्ते खोदाईसाठी परवानगी देताना शहरात होणारी वाहतूककोंडी, त्यावर तोडगा, योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत कोणतेही नियोजन सत्ताधाºयांकडे नाही. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरावर ओढवलेल्या पाणीकपातीसह सर्वच कामांचा बोजवारा उडाला आहे. - दिलीप बराटे, विरोधीपक्ष नेते, महापालिका

टॅग्स :Puneपुणे