शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबा खा, पण जरा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:13 IST

सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ

पुणे : उन्हाळयाचे दिवस आणि आंबा यांची गट्टी जमलेली दिसते. पिवळेधम्म आंबे साहजिकच आपले लक्ष वेधून घेतात. आंब्याची अवीट गोडी नाकारणे केवळ अवघडच. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ आली आहे. सातत्याने आणि जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने पोटदुखी, शरीतातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ, जुलाब असे त्रास उद्भवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आंबे संतुलित प्रमाणात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांंनी दिला आहे. आंब्याचा हंगाम सुरु असताना समोर आलेल्या फोडीला नकार देणे अवघड ठरते. पण तत्पूर्वी आपण या फळाबाबतचे समर्थक व विरोधी असे दोन्ही मुद्दे समजून घेणे आवश्यक असते.आंब्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी, लोह आदी घटक असतात.  इतर फळांप्रमाणे त्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज असते व ग्लुकोजचे प्रमाण किंचित अधिक असते. नियमित व्यायाम करणा-यांनी क्वचित आंबा खाल्ल्यास तितकासा त्रास होत नाही. परंतु, वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्यांनी मात्र एक-दोन फोडींपेक्षा अधिक आंबा खाऊ नये. कोणतेही फळ दिवसातील दोन भोजनांपैकी एक म्हणून खाल्ल्यास सर्वोत्तम असते, कारण या फळातील साखर त्या भोजनानंतर शरीराकडून चरबीच्या रुपात साठवली जाण्याची शक्यता असते.आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अ‍ॅलर्जी लक्षात येत नाही. त्यामुळे तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वर्षी अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नये, असेही सांगण्यात येत आहे.------------मधुमेही लोकांनी साखरेच्या नियंत्रणासाठी आंब्याचे सेवन एखाद्या फोडीपुरते व तेही न्याहारीच्या वेळी करावे. आदर्श वजन गटात असलेल्या बालकांना दोन भोजनांमधील कालावधीत एक आंबा स्नॅक म्हणून देण्यास हरकत नसते. क्रीडा प्रशिक्षणाचा कसून सराव करणा-या प्रौढ व्यक्ती कर्बोदकप्रधान आहारावर असतील तर त्यांनी व्यायामानंतरचे भोजन (प्राधान्याने सकाळी) म्हणून आंबा खावा. 

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाdoctorडॉक्टर