शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर गारठले! शहरावर पहाटे धुक्याची दुलई, किमान तापमानात घट

By श्रीकिशन काळे | Updated: December 8, 2023 10:06 IST

हवेत गारठा असल्याने पुणेच गारठून गेल्याचा अनुभव पहायला मिळाला...

पुणे : यंदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव आज (दि.८) पुणेकर घेत आहेत‌. पहाटे शहरावर धुक्याची दुलई पहायला मिळाली. हवेतील आर्द्रता ९८ टक्के असल्याने रस्त्यावरील दृष्यमानताही कमी झाल्याचे पहायला मिळाले. हवेत गारठा असल्याने पुणेच गारठून गेल्याचा अनुभव पहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यात सकाळी गारठा असला तरी दुपारी मात्र उकाडा जाणवत होता. आता मात्र सकाळी आणि दिवसभर देखील गारवा अनुभवायला मिळत आहे. आज सकाळी तर सर्वत्र धुके धुके झाले होते.

धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात. त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. आज थंडीची लाट आली आहे का ? अशी चर्चा आहे. परंतु थंडीची लाट येते तेव्हा किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खूप खाली जाते. ९ ते ११ जानेवारी २०१७ दरम्यान पुण्यात थंडीची लाट आली होती. तेव्हा पुण्याचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस पर्यंत आले होते. आता हवेली, हडपसर, मगरपट्टा, पाषाण, एनडीए या परिसरातील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या जवळ आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. 

आजपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते आहे. अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याच्या शक्यतेमुळे सोमवार दि.११ डिसेंबर ते बुधवार दि.१३ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली आहे. उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस व बर्फबारीमुळे तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तेथे थंड वातावरण व धुके जाणवत आहे.

- माणिकराव खुळे, माजी हवामानतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमान