शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुणे जिल्ह्यात कोरोना काळात '108' रुग्णवाहिका ठरली 46 हजार रुग्णांसाठी वरदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 11:21 IST

ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकांचाच होता आधार 

ठळक मुद्देजिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोना काळात तब्बल 226 सरकारी रुग्णवाहिका कार्यरत

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासनाची 108 या रुग्णवाहिकेची सुविधा ख-या अर्थाने वरदान ठरली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या 102 रुग्णवाहिका तर 24 तास कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल आहेत. यामुळे किमान ग्रामीण भागात तरी रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एखाद्या रुग्णावर जीव गमावण्याची वेळ आली नाही. गेल्या नऊ महिन्याच्या कोरोना काळात जिल्ह्यात तब्बल 46 हजार 586 रुग्णांना जीवदान दिले. यात 19 हजार कोरोना रुग्ण होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोना काळात तब्बल 226 सरकारी रुग्णवाहिका कार्यरत होत्या.या 108 च्या 82 रुग्णवाहिका असून,  यातील 31 रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर जिल्हा परिषदेच्या 102 सुविधेच्या 92 रुग्णवाहिका आणि खाजगी 52 रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात गंभीर होणा-या प्रत्येक कोरोना रुग्णाला सरकाली रुग्णवाहिके मार्फतच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील कोरोना हाॅस्पिटलमध्ये येऊन येतात. यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी या सरकारी रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध आहेत. -------- जिल्ह्यात 108 च्या  रुग्णवाहिका : 82 - 108 च्या  रुग्णवाहिका चालक : १७०-   108 च्या  रुग्णवाहिका डॉक्टर्स : २०७-------- कोरोनासाठी 108 सुसज्ज  कोरोनाच्या काळात डॉक्टर, चालक यांना कोरोना रुग्ण हाताळणीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले व त्यांना पी पी ई कीट हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्स,मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.  प्रत्येक कोरोना बाधित किव्हा संशयाती रुग्ण हाताळल्या नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण हाताळायला तयार केली जाते. ----सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी तत्पर पुणे जिल्या मध्ये एकूण ८२ रुग्णवाहिका असून,  त्यापैकी २४ रुग्णवाहिका (ALS)  व ५८ रुग्णवाहिका (BLS) आहेत कोरोना काळामध्ये अति गंभीर झालेल्या रुग्णांना, व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे. रुग्नावाहीकेवर डॉक्टर असल्यामुळे त्वरित रुग्णांवर  उपचार सुरु करून हॉस्पिटलला अडमिट केले जाते.- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक १०८ रूग्णवाहिका-------... अन् गंभीर रुग्णाला जीवदान मिळाले मला १०८ कंट्रोल रूम वरून रात्री ३.१० वा. फोन आला. एक रुग्ण अतिशय गंभीर असून,  त्याला पुढील उपचार साठी हॉस्पीटला पाठवायचे आहे. आम्ही १० मिनिटात पोहोचलो १०८ रुग्नावाहीकेवरील डॉक्टर सुनील वायदंडे यांनी रुग्णांना बघितले ती रुग्ण अतिशय गंभीर अवस्तेत होती. तिला  व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन लागणार होता. त्या रुग्णाला व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन देऊन उपचार करत रुग्णालयात दाखल केले व त्या रुग्णाचा जीव वाचला. - सुनील जाधव,  चालक, येरवडा पुणे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल