शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

PMC | पुणे महापालिकेचा दुटप्पीपणा उघड; सार्वजनिक वाहतूकीचा आग्रह तर नव्या रस्त्याचाही घाट

By श्रीकिशन काळे | Updated: April 11, 2023 13:44 IST

नवीन रस्ता केला, तर त्यावरून खासगी वाहने जाऊन त्यातून प्रदूषण वाढणार नाही का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे...

पुणे : एकीकडे महापालिका प्रदूषण टाळा याची जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यासाठी प्रयत्न करते आहे. पण दुसरीकडे वेताळ टेकडीला फोडण्यासाठी रस्ताही प्रस्तावित करत आहे. त्यामुळे महापालिका दुतोंडी वागत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. नवीन रस्ता केला, तर त्यावरून खासगी वाहने जाऊन त्यातून प्रदूषण वाढणार नाही का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

पुणे महापालिका सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट यावर समाजजागृतीसाठी विविध पोस्ट करत असते. आजच ट्विटरवर महापालिकेच्या हँडलवर एक पीएमपी बच आणि पाच कारचे चित्र दाखवले आहे आणि त्याखाली एक की अनेक निर्णय आपला आहे, असे विचारले आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर करा, प्रदूषण टाळा असे आवाहन त्यांनी केले आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोचे उद‌्घाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा देखील त्यांनी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी भर दिला होता.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याने प्रदूषण कमी होऊन वाहतूक कोंडीही सुटते. परंतु, महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यांनी लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी  वेताळ टेकडीवरून बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित केला आहे. त्यामुळे टेकडीचे नुकसान हाेणार आहे. तो रस्ता करून खासगी वाहनांचा प्रोत्साहन देण्याचेच काम महापालिका करत आहे, असा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. लॉ कॉलेज रोडवर जर सार्वजनिक वाहतूक सक्षम केली, तर त्या ठिकाणी सोय होऊन नवीन रस्ता करायची गरज पडणार नाही, पण त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका नवीन रस्ता पुढे रेटत आहे. म्हणून नागरिकांनी या रस्त्याला विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPuneपुणे