शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनेक जिल्हयांत दोन टप्प्यात मतदान होणार असल्याने दुबार मतदानाकडे लक्ष हवे : नीला सत्यनारायण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:34 IST

पुणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे़. त्यामुळे शहरांमध्ये राहणारे नागरिक पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही़...

ठळक मुद्देकोड ऑफ कन्डक्टची अंमलबजावणी काटेकोर व्हावीशहरांमध्ये राहणारे नागरिक पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करण्याची शक्यता

पुणे : मतदारांवर कोणत्याही कृतीचा प्रभाव पडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची असून त्याची अंमलबजावणी कडकपणे होण्याची आवश्यकता आहे़. पुण्यासारख्या जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होत असल्याने एकाचे दोन ठिकाणी मतदान होणार नाही, याची काळजी प्रशासनाने अधिक कडकपणे घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या माजी निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले़. निवडणुक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम रविवारी (दि.१०) जाहीर केला़ त्याचबरोबर आचार संहिता लागू करण्यात आली आहे़. कोड ऑफ कन्डक्टच्या अंमलबजावणीबाबत सत्यनारायण यांनी सांगितले की, अनेकदा कार्यक्रम हे पूर्वनियोजित ठरविलेले असतात़. अचानक आचार संहिता जाहीर झाल्यानंतर ती कामे पुढे ढकलता येत नाही़. त्यावेळी आपण आचार संहिता मध्यरात्रीपासून लागू करण्याचे जाहीर केले होते़. त्यामुळे लोकांना सायंकाळ हातीशी मिळाली होती़. काही कार्यक्रमांना निवडणुक आयोगाची पूर्वपरवानगी घेऊन करता येऊ शकतील़ पण त्यामध्येही मतदारांना प्रभावित होईल अशी कोणतीही घोषणा अथवा कृती करण्यात येणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे़. आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठलीही कृती, भाषण याने मतदार प्रभावित होणार नाही. तसेच असा कोणताही निर्णय शासन किंवा सत्ताधारी पक्ष घेणार नाहीत की ज्यामुळे मतदार प्रभावित होऊ शकेल़ याची तपासणी निवडणुक आयोगाने कडकपणे करत असते़ राज्याच्या प्रशासनाने त्यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे़. या काळात पैशांची वाहतूक करणे गंभीर बाब आहे़. त्याचबरोबर काळात खुनसारखे गंभीर प्रकारही घडतात़. ती कोर्टात जात असली तरी प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता असते़. पुणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे़. त्यामुळे शहरांमध्ये राहणारे नागरिक पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही़. याविषयी सत्यनारायण यांनी सांगितले की, अनेक जण शाई पुसण्याचा प्रयत्न करतात़ याची काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूक