शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या दिशेने, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 21:28 IST

पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. 

पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. ते दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्राच्या किना-यावर 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कोकण, मुंबईसह गुजरातमध्ये समुद्र खवळलेला राहील. येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हे चक्रीवादळ सोमवारी दुपारी चार वाजता हे चक्रीवादळ सुरतपासून अंदाजे 770 किमी अंतरावर होते. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात सोमवारी सकाळी वारे ताशी 110 ते 120 किमी वेगाने वाहत होते. रात्री त्यांचा वेग कमी होण्याची शक्यता असून 5 डिसेंबरला त्यांचा वेग आणखी कमी होऊन ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.या चक्रीवादळामुळे उत्तर व दक्षिण कोकणात काही ठिकाणी सोमवारी हलका पाऊस झाला असून पुढील 24 तासांत उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण कोकण व गोव्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबरला कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.5 डिसेंबरला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व किनारपट्टीलगत ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून असून उत्तर महाराष्ट्राच्या लगतचा समुद्र खवळलेला राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या चक्रीवादळामुळे विदर्भ वगळता संपूर्ण राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 94 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी सायंकाळी सातारा, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 24 तासांत पुणे शहरात काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबई शहर व उपनगरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.मुंबईचा धोका टळलाओखी हे चक्रीवादळ आता दक्षिण गुजरातच्या दिशेने सरकत असून त्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. मुंबईपासून अंदाजे 670 किमी अंतरावरुन ते जात असल्याने मुंबईत पाऊस झाला तरी त्याचा धोका आता टळला आहे. हे चक्रीवादळ साधारणपणे ताशी 13 किमी वेगाने पुढे सरकत आहे. त्याची तीव्रता आता हळूहळू कमी होऊ लागली असून 6 डिसेंबर रोजी ते गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेश करेल, त्यावेळी त्याची तीव्रता खूपच कमी झालेली असेल.डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ