शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शॉर्टसर्किटमुळे विठ्ठलवाडीत तीन घरे झाली भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:33 IST

१२ लाखांचे नुकसान : सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील विंझर येथील विठ्ठलवाडीत (ता. वेल्हे) तीन घरे शॉर्टसर्किटमुळे भस्मसात झाली आहेत. ही घटना बुधवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. विठ्ठलवाडीत काल रात्री ११.३०च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका घराने अचानक पेट घेतला अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांची त्रेधा उडाली. आग इतकी प्रचंड होती की शेजारील दोन घरेदेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या आगीमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रूप धारण केले.

माजी पंचायत समिती सदस्य संतोषअप्पा दसवडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान दाखविले व येथील युवकांच्या साहायाने शेजारी असलेल्या घरांना आगीपासुन वाचविले. या आगीत गणेश मारुती जगताप यांचे संपूर्ण घर जळाले आहे. आगीत त्यांच्या घरातील ४०० किलो तांदूळ, कपाट, टीव्ही सेट, पीठगिरणी, लाकडी कपाट, दिवान, सात तोळे सोने आणि सतरा हजार रुपये रोख जळून भस्मसात झाले. या वेळी लताबाई मारुती जगताप या एकट्याच घरात झोपल्या होत्या. आग लागलेली त्यांना कळालेच नाही. त्यांना येथील तरुणांनी बाहेर काढले. आगीमुळे त्यांच्या हाताला व डोक्याला भाजले. त्यांचे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर मुरलीधर देवजी भिकुले यांचे घरदेखील आगीने भस्मसात झाले आहे. त्यांच्या घरात दोनशे किलो तांदूळ, गहू, घरगुती साहित्य पाच तोळे सोने आणि २२ हजार रुपये रोख आगीत भस्मसात झाले आहे. त्यांचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. परशुराम सदू काटकर यांचेदखील घर आगीने भस्मसात झाले आहे. त्यांच्या घरात दोनशे किलो तांदुळ, १०० किलो गहू आणि इतर धान्य, घरातील साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी आग लागल्याने आग विझविण्यासाठी येथील तरुणांना मोठी कसरत करावी लागली. रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेली आगीला विझविण्यासाठी रात्रीचे तीन वाजले होते.४अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले होते. परंतु, पुण्याहून गाडी येण्यास दीड ते दोन तास वेळ लागला. तोपर्यंत आगीत सर्वकाही भस्मसात झाले होते. अग्निशामक दल केवळ पुणे शहरातच आहे. पुणे-सातारा रस्त्यावर अग्निशामक दलाचा एखादा विभागही नाही. त्यामुळे अतिदुर्गम अशा वेल्हे तालुक्यात अग्निशामक दलाची एक गाडी मिळावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष अप्पा दसवडकर यांनीकेली आहे.४ वेल्हेच्या सभापती संगीता जेधे, वेल्ह्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जेधे यांनी भेट दिली व घटनेच्या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. येथील तीनही कुटुंबे रस्त्यावर आली असून या कुटुंबांना तातडीचे मदत मिळावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेfireआग