शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे इंदापूरची शेती तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:31 IST

खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कळस  - खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या चारही तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांतील पाणी या कालव्यामधून चार तालुक्यांतील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या कालव्यामधून पाणीपुरवठा होतो. पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्या वेळी चार टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते.पुण्याची मागणी वाढल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नवा मुठा उजव्या कालव्यातून शेतीला व बंद पाइपलाइनमधून शहराला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती होईपर्यंत कालव्यामधून शेतीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शेतकºयांना मात्र घाम फुटणार आहे.मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणलेरेडणी : इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना या वर्षी पावसाच्या संकटाने ग्रासले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकºयांकडून कालव्याच्या पाण्याची मागणी झाली होती. त्यानुसार खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यातदेखील आले; परंतु गुरुवारी पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत.या वर्षी कमी पावसामुळे ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. वाढत्या तापमानामुळे बहर धरलेल्या डाळिंबबागांची फूलगळ होत आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपली आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी जलसंपदा अधिकाºयांना पाणी सोडण्यासाठी धारेवर धरले होते. त्यानंतर खडकवासल्याचे पाणी इंदापुरातील शेतकºयांना सोडण्यात आले होते; परंतु काल पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे ते बंद करण्यात आले. यामुळे ‘दुष्काळात तेरावा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या