शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:25 IST

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाठेठाण  - दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.संपूर्ण बागायती पट्टा आणि ऊसपिकाचे आगर म्हणून परिचित असलेल्या राहूबेट परिसरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी पाऊस झाला नसल्याने ऊसलागवड, तसेच पेरणीपूर्वी मशागती, पेरणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेल्या मिरवडी, दहिटणे, खामगाव, नांदूर, सहजपूर, उंडवडी, शिंदेनगर, राहू, पिलाणवाडी, देवकरवाडी, मगरवाडी, टेळेवाडी, पिंपळगाव, वाळकी आदी गावात पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस जोरात आहे.परंतु भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने त्यातच पावसाने दडी मारल्याने पाण्यावर अवलंबून असलेल्या पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर या ठिकाणी शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने उभी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची जणू धडपड सुरू आहे. पाण्याअभावी कुठलीही पिके घेण्यासाठी धाडस होत नसून चांगला पाऊस झाल्यानंतरच ऊसलागवड, पेरणीच्या कामास सुरुवात करणार असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षेतवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात वारे, कडकडीत ऊन, उष्णता यामुळे पावसाची अपेक्षा लांबली असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीपासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे. जर अशीच उष्णता, कडकडीत ऊन, वारे वाहत गेल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी नक्कीच लांबणार असल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालेला दिसत आहे.हुलकावणी दिल्याने येथील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. ७ जूनला वेळेवर पावसाचे आगमन झाले असल्याने येथील शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करण्यावर भर दिला होता.बाजारात चार ते पाच वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी वेळेवर बी-बियाणे खरेदीदाराकडे वळला होता. परंतु तालुक्यात एकदाच जोरदार पाऊस झाल्याने शेतातील ओल पेरणीयोग्य नसल्यामुळे येथील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहावयासमिळत आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी उन्हाळ्यात पेरणीयोग्य मशागत करून शेतातील कामे उरकून ठेवली आहेत.मृग नक्षत्रात पहिल्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. त्यामुळे येथील शेतकºयांना आनंद झाला होता.हवामान खात्याच्या अंदाजपत्रकात जूनमध्ये मुसळधार व अतिवृष्टीचा इशारादिलेला होता.पावसाचा अंदाज घेऊन शेतकºयाने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारातील कृषी सेवा केंद्रात झुंबड उडाली होती. परंतु काही दिवसांनी वातावरणात कमालीचा बदल होऊन पुन्हा ऊन, वारे यांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बी-बियाणे भरून ठेवलेल्या शेतकºयांना पश्चाताप करावा लागत आहे. या महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी लांबणार असल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे