शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:42 IST

वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला.

पौड : पौड (ता.मुळशी) येथील एस.टी.बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला. यु.के.महामुनी असे वाहतुक नियंत्रकाचे तर सुलताना रशिद सिद्दिकी असे वाहकाचे नाव आहे. रामचंद्र दातीर यांना हा सुखद अनुभव आला.मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक रामचंद्र दातीर हे मालेगावी जाण्यासाठी वनाजहून संभवे एसटीत बसले. गाडीचे चालक हैदर नदाफ, तर वाहक सुलताना सिद्दिकी होत्या. दातीर पौडला उतरले. त्यानंतर संभवे एसटी करमोळीफाटा, रावडेमार्गे संभवेकडे मार्गस्थ झाली. थोड्या वेळाने आपला मोबाईल गाडीतच राहील्याचे दातीर यांच्या लक्षात आले. ते लागलीच पौडच्या एसटी बस डेपोचे वाहतूक नियंत्रक महामुनी यांना भेटून घडलेली घटना सांगितली. दरम्यान दातीर यांच्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी प्रवाशी महिलेने तो मोबाईल पिशवीत लपवून ठेवला होता. दरम्यान महामुनी यांनी वाहक सिद्दिकी यांना फोन करून एक मोबाईल हरविल्याचे सांगितले. दातीर यांच्या मोबाईलचा नंबरही त्यांनी दिला. त्यावेळी एसटी शिळेश्वरच्या आसपास होती. सिद्दिकी यांनीही चलाखीने गाडी थांबवून हरविलेला मोबाईल कुणाला सापडलाय का याची चौकशी केली. त्यावेळी कुणीही तयार होत नव्हते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मोबाईलवरून दातीर यांच्या मोबाईलशी संपर्क साधला. त्यावेळी गाडीतच त्यांच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्या दिशेने सिद्दिकी गेल्या असता महिलेच्या पिशवीतून मोबाईलचा आवाज आला. त्यावेळी सिद्दिकी यांनी त्या महिलेकडून मोबाईल ताब्यात घेतला. संभव्यावरून गाडी पुन्हा पौडला आल्यानंतर सर्व कायदेशीर सोपास्कार पूर्ण करून दातीर यांना मोबाईल परत दिला. ग्रामीण भागात आजही प्रवास करताना ग्रामस्थांचे एसटीशी कौटूंबिक नाते जडले आहे. त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून आणि चलाखी दाखविल्याने आपला मोबाईल परत मिळाला, अशा भावना दातीर यांनी व्यक्त करत एसटी महामंडळाचे आभार मानले.

टॅग्स :PaudपौडMobileमोबाइलThiefचोर