शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

राजकीय लुडबुडीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 00:41 IST

शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका दिलीपराव वळसे पाटील यांनी केली.

टाकळी हाजी - शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका करत राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी सध्याच्या राज्यातील शिक्षणातील बदलाबद्दल खंत व्यक्त केली.पिंपरखेड (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील होते. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे, अरुणा घोडे, शिरूर, आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शरद लेंडे, सावित्रा थोरात, वासुदेव जोरी, सरपंच मंदा बोंबे, उपसरपंच रामदास ढोमे, शरद बोंबे, भाऊसाहेब ओटी, बाळकृष्ण कळमकर, मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, चांदाशेठ गावडे, माऊली ढोमे, बिपीन थिटे, नरेश ढोमे, दामुशेठ दाभाडे, डॉ. जयश्री ताई जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, नवीन शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, म्हणाले की, पिंपरखेडचे ज्येष्ठ नेते कै. दगडू अप्पा ढोमे यांचे गाव व शालेच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असून या पुढेही गावच्या विकासासाठी निधी कमी कमी पडू दिला जाणार नाही. या वेळी मंगलदास बांदल, विवेक वळसे, सुनीता गावडे, अरुण गिरे, यांची भाषणे झाली.तुम्ही आखाडा भरवा, मी कुस्ती करणार... बांदलयावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बोलायला उभे राहिल्यावर एका शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याबाबतची चिठ्ठी पाठविली, त्यावर बांदल म्हणाले की, कांद्याचा विषय केंद्र सरकारचा आहे, त्यासाठी तुम्ही मला केंद्रात पाठवा, त्यानंतर दुसºया एका कार्यकत्यांनी चिठ्ठी पाठविली की, लोकसभेची कुस्ती करणार का, यावर बोलताना बांदल म्हणाले की, मी पैलवान आहे, तोही शिरूर तालुक्यांचा. बापूसाहेब थिटे व पोपटराव गावडे यांचा पठ्ठ्या आहे. थिटेसाहेब दिल्लीला गेले होते, हा इतिहास आहे. मीही आखाड्यात उतरून कुस्ती खरीच करणार तुम्ही फक्त आखाडा भरवा, असं म्हणताच उपस्थितांमधून प्रचंड दाद मिळाली. यावेळी खासदार आढळराव पाटील व वळसे पाटील मात्र लक्ष देऊन बांदलांची टोलेबाजी ऐकत होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण