शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

कागदांची खरेदीच केली नसल्याने गुणपत्रिका रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:08 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास थोडासा उशीर झाल्यास लेट फी घेतली जाते, त्याचवेळी निकाल प्रक्रियेत अक्षम्य कुचराई करणा-या दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्यापाठोपाठ मे २०१७ मध्ये दुसºया सत्राचाही निकाल जाहीर करण्यात आला; मात्र या दोन्ही निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाºया दहा हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएला प्रवेश घेतले आहेत. बँकेत गुणपत्रिका जमा न केल्यामुळे त्यांचे पुढील वर्षासाठी मिळणारे लोन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण धोक्यात सापडले आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गोंधळाची परंपरा पुढेही चालूच आहे. विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून घेतले जाते. त्याबदल्यात सुरळीतपणे परीक्षा घेऊन त्यांच्या निकालाचे योग्य प्रकारे वितरण करण्याची जबाबदारी परीक्षा विभागावर आहे; मात्र परीक्षा विभागाने गुणपत्रिकांची छपाई करण्यासाठी कागदांची खरेदीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकणार नाही. कागदांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यानंतर निकालाची छपाई असे सोपस्कार पार पाडावे लागणार आहे. एक वर्षानंतर जर कागद खरेदी करून गुणपत्रिकांची छपाई केली जाणार असेल, तर इतके दिवस परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी काय करीत होते, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.>कुंपणाच्या कामाचाफेरआढावा घेणारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध विभाग, जंगल यांना कुंपण घालण्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाच्या वर्क आॅर्डर काढण्यात आल्या आहेत. यापैकी ६ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले असून, आणखी ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.>एक वर्षापासून विद्यार्थी वंचितएमबीएच्या विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत, याची कोणतीही माहिती परीक्षा विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव अरविंद शाळिग्राम यांना देण्यात आली नाही. कुलगुरू गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते, परतल्यानंतर याप्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.>संबंधित अधिकाºयांशी चर्चाएमबीएच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्याबाबत शुक्रवारी परीक्षा विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली जाणार असल्याचे व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.