शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा खून, मुले नको असल्याने रागात केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 03:24 IST

  जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना घडना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथे उघडकीस आली. नारायणगाव पोलिसांनी अवघ्या ७ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.

नारायणगाव -  जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना घडना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथे उघडकीस आली. नारायणगाव पोलिसांनी अवघ्या ७ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.चांगुणा (सविता) दशरथ आतकरी (वय २८, आतकरी मळा, सुलतानपूर, ता.जुन्नर) असे आईचे नाव आहे. तर आरू दशरथ आतकरी (वय ६), साहिल दशरथ आतकरी (वय ४.५) अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी मुलांचे वडील दशरथ आतकरी यांनी मुलांच्या आईविरुद्ध मंगळवारी, दि. २७ रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांगुणा व दशरथ आतकरी यांना ३ मुली व १ मुलगा असा परिवार आहे. या चार जणांचा सांभाळ चांगुणाला करावा लागत होता. मुलाच्या हव्यासापोटी तीन मुली व एक मुलगा सांभाळणे तिला नको वाटायचे. तिला पहिली मुलगी झाली तेव्हा ही एकच मुलगी असावी असे तिला वाटत होते. रोज शेतातील कामे, गुरे पाहणे ही रोजची कामे करावी लागत होती. या संसाराला चांगुणा वैतागली होती. त्यामुळे तिने या पूर्वीही मुलांना मारण्यासाठी विहिरीवर घेऊन गेली होती.दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी चांगुणा व दशरथमध्ये शर्टावरून वाद झाला होता. त्या वेळी तिने तुझ्या वंशाला दिवा ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी आरू व साहिलला घेऊन ती शेतात गवत कापण्यासाठी गेली. संध्याकाळी ६च्या सुमारास शेताजवळील संपत जगदाळे यांच्या विहिरीत मुलाला ढकलून दिले. हा प्रकार मुलीने पाहिल्याने भीतीपोटी तिने मुलीलाही विहिरीत ढकलून दिले. दोन मुले दिसत नसल्याने दशरथने पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक दीपक साबळे, आबा चांदगुडे, शंकर भवारी, रामचंद्र शिंदे , दिनेश साबळे यांनी सखोल तपास सुरू केला.संशयाची सूई चांगुणावर असल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यानंतर तिने दोन्ही मुलांच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दि. ३ रोजी चांगुणाला अटक करून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. जुन्नर न्यायालयात तिला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा