शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायदेशीर मान्यतेमुळे ड्रोनला आता झाले मोकळे आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 02:19 IST

ड्रोनचा वापर करण्यासाठी आजपासून (दि. १) कायदेशीर मान्यता मिळाली असून, त्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीला चालना मिळेल.

पुणे : ड्रोनचा वापर करण्यासाठी आजपासून (दि. १) कायदेशीर मान्यता मिळाली असून, त्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीला चालना मिळेल. तसेच, सामान्य नागरिकांनाही आता काही अटी व नियमांवर हे ड्रोन दिवसा वापरता येईल. त्यामुळे शहरात आता ड्रोनसाठी मुक्त आकाश मिळाले आहे.डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिशन (डीजीसीआय) यांच्यातर्फे ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांसाठी आता डिजिटल स्काय उपलब्ध झाले आहे. आॅगस्टमध्येच नवीन नियम तयार करण्यात आले होते. ते आता १ डिसेंबरपासून लागू आहेत. सामान्य नागरिकांना केवळ दिवसा ड्रोन वापरता येईल. मायक्रो ड्रोन वापरताना ते जमिनीपासून २०० फूटांपर्यंत वापरता येऊ शकते. पाच ड्रोनना परवानगी असेल. त्यांमध्ये नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे प्रकार आहेत.नॅनो ड्रोन हे २५० ग्रॅम वजनाचे असले पाहिजे. तसेच त्यासाठी युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर (यूआयएन) गरजेचा आहे. त्यासाठी डीजीसीआयकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. २५० ग्रॅमपेक्षा अधिक वजन असणाऱ्या सर्वच ड्रोनना हे लागू आहे. नॅनो हा ५० फुटांपेक्षा अधिक वर उडवू शकत नाही. जर त्यापेक्षा वर उडवले, तर तो नियमांचा भंग ठरणार आहे. ५० फुटांहून अधिक उंच उडवायचा असेल, तर त्यासाठी यूआयएन आणि अनमॅन्ड एअरक्राफ्ट आॅपरेटर परमिट (यूएओपी) आवश्यक आहे. यूआयएनसाठी १ हजार रुपये शुल्क आणि यूएओपीसाठी २५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यूएओपीचे शुल्क भरल्यानंतर ते ५ वर्षांपर्यंत त्याची वैधता असेल. पाच वर्षांनंतर १० हजार रुपये भरून परवानगीचे नूतनीकरण करू शकता.मायक्रो ड्रोन हे २५० पेक्षा अधिक वजनाचे आणि २ किलोग्रॅमपर्यंत असेल. यासाठी यूआयएन नंबर बंधनकारक आहे. २०० फुटांपेक्षा अधिक उंचीसाठी या ड्रोनचा वापर होऊ शकतो; परंतु त्यासाठीस्थानिक पोलीस ठाण्यात तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल. तीदेखील २४ तासांपूर्वी तशी नोंद करावी लागेल.स्मॉल ड्रोनचे वजन २ किलोग्रॅम आणि २५ किलोग्रॅमपर्यंत असेल. याला यूआयएन आणि यूएओपी दोन्ही नंबर आवश्यक असतील. हे ड्रोन कृषिक्षेत्रासाठी उपयोगी ठरणारे आहे.तसेच, याद्वारे औषधफवारणीदेखील करता येईल.>ड्रोनसाठी डीजीसीआयने घालून दिलेले नियमड्रोनसाठी डिजिटल स्कायची परवानगी घेतलेली असावी. परवानगी नसेल, तर उडविता येणार नाही.डीजीसीआयतर्फे यूआयएन नंबर घेऊन तो ड्रोनमध्ये बसविणे आवश्यक.प्रत्येक वेळी ड्रोन उडवताना त्याची माहिती डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मला द्यावी.ड्रोन हे व्यवस्थित चांगल्या स्थितीत हवे. ते तुटलेले किंवा नादुरुस्त असू नये.ड्रोन चालविताना ते तुमच्या डोळ्यांसमोर असले पाहिजे. तसेच, रिमोट कंट्रोलचे सिग्नल मिळतील एवढेच दूर न्यावे.हवामान चांगले असेल तेव्हा उडवावे.कारण, ढगाळ वातावरणात त्याचा सिग्नल व्यवस्थित येत नाही.नो ड्रोन झोन, मनाई असलेला परिसराचे नियम पाळावेत.लोकांची प्रायव्हसी जपली पाहिजे.स्थानिक पोलिसांकडे उड्डाणाच्या वेळेची माहिती द्यावी.काही अपघात झाला, तर त्वरित डीजीसीएला किंवा स्थानिक पातळीवरील संबंधित व्यक्तींना त्याची माहिती द्यावी.>काय करू नये ?नॅनो ड्रोन जमिनीपासून ५० फुटांपेक्षा अधिक वर उडवू नयेमायक्रो ड्रोन जमिनीपासून २०० फुटांपेक्षा अधिक उडवू नयेकोणतेही ड्रोन ४०० फुटांपेक्षा अधिक उंचीवर नेऊ नयेविमानतळ किंवा हेलिकॉप्टरच्या परिसरात ड्रोन उडवू नयेपरवानगीविना कोणत्या गर्दी असणाºया ठिकाणी उडवू नयेमिलिटरी परिसर, सरकारी परिसरात ड्रोन नेऊ नयेपरवानगीशिवायकोणत्याही खासगी क्षेत्रात ड्रोन नेऊ नयेचालत्या वाहनांवर, जहाजावर किंवा एअरक्राफ्टवर ड्रोननेऊ नयेलहान मुलांना खेळण्यासाठीच्या ड्रोनची किंमत १,५०० पासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये कॅमेरा हवा असेल, तर ते ड्रोन साधारण साडेचार हजारांपासून पुढे उपलब्ध आहे. मीडियम ड्रोनचे वजन २५ किलोग्रॅमपेक्षा अधिक आणि १५० किलोग्रॅमपेक्षा कमी असणार आहे. हे ड्रोन खास करून इंडस्ट्रीज आणि कृषिक्षेत्रासाठी अधिक उपयोगी ठरणारे आहे. लार्ज ड्रोनचे वजन हे १५० किलोग्रॅमपेक्षा अधिक असेल. त्याचा वापर केवळ मोठ्या इंडस्ट्रीजसाठी होऊ शकेल. आॅईल, वीज, रेल्वे, महामार्ग, खाण, गॅस आदींसाठी ते उपयुक्त ठरेल.>हा निर्णय क्रांतिकारक ठरणारमोबाईलपेक्षा हे क्रांतिकारक ठरणार आहे. नवीन ड्रोन युग सुरू होत आहे. जोपर्यंत दिसतं, तोपर्यंत ते वापरू शकत होता. लांब पल्ल्यासाठी वापर करता येऊ शकेल. आपत्कालीन कार्यासाठी वापर, कृषीसाठी, औषधफवारणी, देखरेखीसाठी, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रोन हा प्रकारही परदेशात आहेत. मेडिसीन यामध्ये वापरले जाते. अवयवदानासाठीही वापरण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात झाला, तर ताबडतोब मदतीसाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो. मोठ्या वजनाचे असेल. ड्रोन टॅक्सीचा प्रयोग सुरू आहे. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ड्रोनने जाऊ शकता. त्यासाठी खूप कालावधी जावा लागेल. उंच इमारतीच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी वापर होऊ शकतो. फायर फायटिंगसाठी वापर होऊ शकतो. ड्रोनने पाईप वर पाठवून आग विझवू शकता. वाईल्ड लाईफमध्ये वापर होत आहे. या ड्रोनचा जसा फायदा, तसेच तोटे आहेत. गैरवापर होऊ नये म्हणून नियंत्रण नाही ठेवले, तर खूप घातक होईल. ड्रोनवर ब्लेड असतात. त्यामुळे ते धोकादायक ठरू शकते. नो फ्लाइंग झोनमध्ये, विमानतळ परिसरात ड्रोनला परवानगी देण्यात आलेली नाही. ड्रोन हॅक करू शकता. त्यामुळे त्यासाठी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ