शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:47 IST

एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

खेड : एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाव सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून किंवा नाफेडच्या माध्यमातून अद्याप कोणतीही उपाययोजना सुरू होत नसल्याने शेतकºयांमधून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. कांद्याबाबत योग्य उपाययोजना नजीकच्या काळात न केल्यास मोठा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल कांद्याचा दर २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. लागवडीपासून काढणीपर्यंत आणि बाजारपेठेपर्यंतचे परिश्रम व मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पाहता, सध्या कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू करण्याबद्दल पावले उचलली जात नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा कांदालागवडीकडे कल आहे. जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांत तसेच शेजारील जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर या तालुक्यांत विशेषकरून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षांचा उत्पादन व भाव यांचे गणित अपवादात्मक वेळाच जुळून आले. यंदाही आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात शेतकºयांनी कांदालागवडी उरकून घेतल्या. लागवडीनंतर आॅक्टोबर महिन्यात चांगला भाव शेतकºयांना मिळाला. मात्र, साधारण महिन्यापासून नवीन कांद्याची काढणी सुरू झाली आणि दर घसरला. मजुरीचे वाढते दर, बियाणे, खते, फवारणी, मशागत आणि काढणी, साठवण, वाहतूक खर्च आणि विक्री किंमत याचा ताळमेळ बसेना; त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता आहे. कांदालागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.शेतकरी उत्पादक कंपनी ठरू शकतात निर्णायक...व्यापारी, अडते, कमिशन एजंट वगैरे साखळी मोडीत काढण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनींची भूमिका निर्णायक ठरू शकते. शेतकरी ते ग्राहक यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या उत्तम पर्याय ठरू शकतो. स्वत:ची आउटलेट सुरू करण्यासाठी आणि अत्यल्प व्याजाने या कंपन्यांना पतपुरवठा करताना उत्पादक कंपन्यांना सरकारने पाठबळ दिल्यास सध्याच्या व्यापारी, अडते, कमिशन एजंट, होलसेलर या साखळीला पायबंद बसून शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. अर्थात, उत्पादक कंपन्यांना सरकारी पाठबळ मिळाल्यास शेतमालाच्या भावाची समस्या कमी होऊ शकते.कांदा उत्पादक शेतकºयांना शासनाचे चुकीचे धोरण अडचणीत आणीत आहे. हमी भाव उत्पादनखर्चावर आधारित देणे आवश्यक आहे. नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येत नाही. शेतकºयांना योजना लागू करताना सरकारी तिजोरीवर भार पडतो. ही नौटंकी सरकारने थांबवावी. कृषिप्रधान देशात नोकरशाही आणि उद्योगपूरक भूमिका योग्य आहे.- अनंथा बढे,कांदा उत्पादक

टॅग्स :onionकांदाPuneपुणे