शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने फवारणी यामुळे शेतकऱ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 22:23 IST

वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. 

पुणे : वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र कीटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. कापसावरील बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जहाल कीटनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकºयांना आपले प्राण गमवाले लागले आहे. खरेतर कीटनाशकांच्या फवारणीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजुर रुग्णालयात दाखल होत असल्याचे वृत्त गेल्या दोन महिन्यात सातत्याने येत होते. मात्र, त्याची तीव्रता मळमळणे, उलटी आणि चक्कर अशापुरती मर्यादित होती. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली, याबाबत बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले, सप्टेंबर-आॅक्टोबरची हिट वाढत असतानाच गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटनाशकांची फवारणी करताना हाय प्रेशरचे यंत्र वापरले जात आहे. त्यामुळे एक धुके निर्माण झाल्यासारखे होते. असे करताना ना डोळ्यांवर चष्मा घातला जातो, ना तोंड नाक झाकले जाते. कीट नाशकाची फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकणे आवश्यक असते. वेळोवेळी याबाबतचे निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पाऊस असो वा नसो, कीटनाशक वाहून जाऊ नये म्हणून पावसाळ््यात वापरले जाणारा गोंदसारखा पदार्थ देखील फवारला जातो. असे गोंद आणि औषध फवारणाºयाच्या त्वचेला चिकटून राहते. त्वचेतील रंध्रांमार्फत शरीरात झिरपते. औषधाची तीव्रता वाढावी यासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी औषधे एकत्र करुन, त्याची फवारणी केली जाते. त्यामुळे औषधाचा विषारीपणा आणखी वाढतो. असे कीटनाशक श्वसनावाटे, त्वचेवाटे शरीरात जाते. त्यामुळे असा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नेमाडे म्हणाले.  

काय घ्यावी दक्षता 

- कीटनाशक फवारताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा चष्मा, नाका-तोंडावर मास्क लावावे- कोणत्याही प्रकारची जखम असल्यास कीटनाशक फवारणे टाळावे- किटनाशक फवारल्यावर संपूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय न्याहरी अथवा तंबाखू खाणे टाळावे 

बोंडअळीवर कामगंधची मात्राबोंड अळी आटोक्यात आणण्यासाठी जहाल कीट नाशके वापरण्या ऐवजी कामगंध सापळे लावल्यास उपयुक्त ठरते. या सापळ्याकडे नर आकर्षित होऊन मरतो. त्यामुळे अळ्यांचे प्रजनन होत नाही. एकरी असे १० ते १२ सापळे देखील पुरतात. एका सापळ्याची किंमत ३७ ते ४० रुपये आहे. याशिवाय पिवळे आणि निळे चिकट सापळे देखील उपलब्ध आहेत. त्याचा एकरी खर्च केवळ १ हजार रुपये येतो. यात बरोबर निंबोळी अर्क फवारणी देखील यावर उपयुक्त असल्याचे यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी