शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विमान जड झाल्याने सामान ठेवले पाटण्यातच, विद्यार्थ्यांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 04:35 IST

विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले.

पुणे : विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. प्रवाशांना याची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.पाटणा ते पुणे अशी नवी विमानसेवा पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वाजता पाटण्याहून एसजी ३७६ ही फ्लाईट होती. मात्र, काही कारणाने सुमारे ५० मिनिटे उशिराने फ्लाईट निघाली. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ उलटूनही सामान मिळाले नाही. विमान प्रशासनाकडे अधिक चौकशी केली असता वजन जास्त झाल्याने सामान काढून ठेवल्याचे उत्तर देण्यात आले. यात सुमारे ५० प्रवाशांच्या सामानाचा समावेश आहे.या सामानात काही प्रवाशांच्या कपड्यांसह घराच्या किल्ल्या, कार्यालयाची कागदपत्रे आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, न विचारता सामान काढून कसे ठेवले? असा सवालही विचारला आहे. याबाबत संबंधित कंपनीने चूक मान्य केली असून, उद्या सामान घरपोच करण्याचा वायदा केला आहे. पण, यामुळे झालेला मनस्ताप आणि होणारे परिणाम यासाठी मनाने कारभार करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करायला हवी, असे मत प्रवासी कौशल झा यांनी व्यक्त केले. विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला असता तिथून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. अदिती खेतान या पाटण्यातील विद्यार्थिनीचा यात समावेश असून, आज तिला अ‍ॅडमिशन घ्यायची होती. मात्र, तिची सर्व कागदपत्रे बॅगेत असून, सर्व सामान पाटण्यात राहिले आहे. अनामिका नावाची विद्यार्थिनीही अडचणीत असून, तिला प्रवेश घ्यायचा असून, कॉलेज आणि होस्टेलसाठी भरलेल्या पैशाचा डीडी असलेली बॅगही आणण्यात आलेली नाही. पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याने कोठे राहायचे, हा प्रश्न तिच्यापुढे होता.

टॅग्स :Puneपुणे