शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:24 AM

बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही.

यवत : बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही.काही वर्षांपासून बोरीभडक गावाकडे जाणाया रस्त्यावरील पूल धोकादायक बनला होता. पाटबंधारे विभागाने काही महिन्यांपूर्वी पुलावरील वाहतूक बंद केली होती. यामुळे पुलावरून कसलीही वाहतूक होत नव्हती. मात्र, एका महिन्यापूर्वी गावातील काही युवकांनी पुलाच्या बाजूला टाकलेले काटे हटवून परत पुलावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, वाहतूक सुरू झाली असली तरी अवजड वाहतूक पुलावरून होत नव्हती.बोरीभडक गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असणारा पूल आता पूर्णत: पडल्याने गावातील ग्रामस्थांना मोठा वळसा घालून बोरीऐंदी गावाकडे जाणाºया पुलाचा वापर वाहतुकीसाठी करावा लागणार आहे. मात्र, बोरीऐंदीच्या रस्त्यावरील पूलदेखील मोडकळीस आलेला असल्याने त्याही पुलावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. भविष्यात तोही पूल पडल्यास हजारो नागरिकांची मोठी गौरसोय होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. यामुळे नवीन पुलाचे काम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. पुल कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांची मोठी अडचण होऊ शकते.>आमदार राहुल कुल यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी पांडुरंग शेलार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. वाय. पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यावर खांबविरहित रचना असलेला पूल बांधण्याचे ठरले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रचना बदलून दिल्यानंतर जलसंपदा विभागानेदेखील नवीन खांबविरहित पुलाच्या रचनेला मान्यता दिली असून, लवकरच पुलाचे सुरू केले जाईल, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बोरीभडक येथील पूल पडल्याने एकाच पुलावरून वाहतूक सुरू राहील. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, यासाठी आमदार राहुल कुल व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असून लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे बोरीभडक गावचे उपसरपंच विकास आतकिरे व माजी सरपंच दशरथ कोळपे यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे