शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आगडोंब विझेना, प्रवासी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 14:25 IST

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे.

ठळक मुद्देपीएमपी बस पेटल्याचे प्रकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान

पुणे : अचानक आग लागून बस पेटण्याच्या घटना थांबविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत पाच बस पेटल्या आहेत. बसेसचे फायर आॅडीट करण्याचा निर्णयही गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान आहे.मागील काही वर्षांत पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या काही बसेसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. साधारणपणे दीड महिन्यातून एक बस जळून खाक होत आहे. दि. १ जानेवारी ते दि. १० सप्टेंबर या कालावधीत पीएमपीच्या मालकीच्या दोन व खासगी ठेकेदारांकडील तीन बसेसला आग लागली आहे. काही बसेसने प्रवासी असतानाच पेट घेतला होता. तर काही बसेस पार्किंगमध्ये उभ्या असताना पेटल्या. पाचही अपघातांमध्ये प्रवाशांना कसलीही हानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी (दि. १०) पेटलेली बस पार्किंगमध्ये उभी होती. मार्गावर येण्यापुर्वीच शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. रात्रभर पार्किंगमध्ये असलेली बस मार्गावर येण्यापुर्वी काही वेळ आधी पेट घेते, याचा अर्थ या बसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसते. ही बस खासगी ठेकेदाराकडील होती. प्रशासनाने यापुर्वीही ठेकेदारांच्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर ताशेरे ओढले आहेत. पण त्यानंतरही ब्रेकडाऊन किंवा बसला आग लागण्याचे प्रकार सुरूच आहे. ठेकेदारांप्रमाणेच पीएमपीच्या मालकीच्या बसही अधुनमधून पेट घेतात. ब्रेकडाऊनचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेकडो बस १० वर्षांपुढील असल्याने या बसेसच्या क्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. पण सध्यातरी पीएमपीकडे या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुनाट, खिळखिळया झालेल्या बस मार्गावर आणणे गरजेचे आहे. पण हे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. यासाठी केवळ पीएमपी प्रशासन जबाबदार नसून दोन्ही महापालिकांमधील तत्कालीन व सध्याचे सत्ताधारीही कारणीभुत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवासी संघटना करतात. ---------------