शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

तीव्र विरोधामुळे सूक्ष्म सर्व्हे थांबवला

By admin | Updated: November 16, 2016 02:17 IST

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून कुंभारवळण गावापासून सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार होती

खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून कुंभारवळण गावापासून सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार होती. यासाठी शासनाच्या प्रतिनिधींसमवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा आला होता. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पथकाला मोजणी न करताच परतावे लागले.या वेळी तहसीलदार सचिन गिरी, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, राजेंद्र मोरे, सासवडचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड, बाळासाहेब कोंडुभैरी, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, गणेश पिंगुवाले यांसह पोलीस व महिला पोलीस कर्मचारी, पुरंदरमधील महसूल विभागाचे मंडलाधिकारी संजय बडधे, सर्व कर्मचारी उपस्थित होते.तर पोलिसांचे सहा पिंजरे, सासवड नगरपालिकेची रुग्णवाहिका आणि सासवड व जेजुरी नगरपालिकांची अग्निशामक वाहने आदी फौजफाटा तैनात केला होता. हा केवळ सूक्ष्म सर्व्हे असून, याला शेतकऱ्यांनी विरोध करू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सोमवारी बाधित गावांत जाऊन केले होते. त्या वेळी बाधित गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना चर्चेसाठी बोलविण्याची मागणी केली होती. मंगळवारी सर्व्हेचे पथक पोलीस बंदोबस्तात आले असता, कुंभारवळणसह इतर बाधित गावांतील शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. जिल्हाधिकारी यांच्यासोबत प्रत्येक बाधित गावांतील सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व इतर दोन प्रमुखांची बैठक घेण्याचे ठरले आहे. तोपर्यंत सर्व्हे होऊद्या, अशी विनंती करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनीही सदरच्या बैठकीपर्यंत हा सर्व्हे थांबवावा, असे शासनाला आवाहन केले. त्यानुसार मंगळवारचा सर्व्हे थांबविण्यात आला. या वेळी माजी उपसभापती देविदास कामथे व सरपंच अमोल कामथे यांनी जिल्हाधिकारी यांना बाधितांच्या व्यथा सांगून विमानतळ सूक्ष्म सर्व्हे थांबविण्याची विनंती करणार आहोत. त्यानंतरही त्यांची भूमिका विमानतळाच्या बाजूने राहिली तर आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर)